पुणे,दि.१०:- पुणे शहरात रात्री रात्री १०.०० वा. नंतर मोठ-मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या हॉटेल आणि पबविरुद्ध पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.रात्री उशिरापर्य़ंत कायद्याचे उल्लंघन करुन मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम सुरु ठेवणाऱ्या बाणेर येथील ‘हेवन रुफटॉप हॉटेल तसेच ५ व्या मजल्यावरील हेवन क्लब बार’वर शुक्रवार (दि.०९) कारवाई केली आहे. या कारवाई पोलिसांनी १ लाख ६० हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम जप्त केले आहे.
आवाजाची मर्यादा ओलांडणे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. बाणेर येथील ‘रुफटॉप हॉटेल तसेच ५ व्या मजल्यावरील हेवन क्लब बार मध्ये रात्री रात्री १०.०० वा. नंतर साऊंड सिस्टीम सुरु असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता रात्री दहानंतर नियमांचे उल्लंघन करुन साऊंड सिस्टीम सुरु असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी 2 लाख 70 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम जप्त केले. तसेच या हॉटेलवर ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन २००० ) नियम मधील तरतुदींचा भंग केल्याबद्दल कारवाई करण्यात आली असुन सदर हॉटेलचे चालक / मॅनजर तसेच डिजे चालक यांचे विरुध्द पुढील कारवाईसाठी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे अहवालासह मुद्देमाल जमा करण्यात आला आहे.सदरची कारवाई अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त गुन्हे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच स.पो.निरी अश्विनी पाटील, स. पो. निरी अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, अजय राणे, आण्णा माने, हनमंत कांबळे, इरफान पठाण, अमित जमदाडे, पुष्पेंद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे.