पुणे,दि.१८:- पुण्यात सहकारनगर परिसरात एका पान टपरी चालकाकडे पाच हजार रुपये खंडणी मागितल्या याप्रकरणी दोघांना पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक एकने अटक केली आहे. हा प्रकार सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
गणेश सुनिल मोरे (वय-26), मयुर नारायण दारवटकर (वय-26 दोघे रा. संभाजीनगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार धीरज आरगडे हा फरार आहे. याबाबत पान टपरी चालकाने खंडणी विरोधी पथक एककडे तक्रार अर्ज केला होता.
आरोपींनी टपरी चालकाला चाकूचा धाक दाखवून दोन हजार रुपये घेतले होती. तसेच प्रत्येक महिन्याला पाच हजार दिले नाहीतर दुकान तोडून टाकण्याची धमकी दिली. याबाबत टपरी चालकाने 11 जानेवारी रोजी पुणे पोलिसांन कडे अर्ज केला होता. अर्जाची चौकशी केली असता आरोपींनी खंडणीची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली कि गणेश मोरे आणि मयुर दारवटकर हे धनकवडी परिसरात असल्याची माहिती पोलीस हवालदार भापकर यांना मिळाली. पोलिसांनी धनकवडी परिसरातून आरोपींना अटक केली. व पुढील तपाससाठी आरोपींना सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक अजय वाघमारे,
सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील,पोलीस अंमलदार संजय भापकर,
सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे यांच्या पथकाने केली.