पुणे,दि.१८ :- माझ्या विरोधी मित्रांबरोबर फिरतो, या कारणावरुन एका तरुणाच्या डोक्यात, पाठीवर वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
गणेश प्रकाश जाधव (वय १९) आणि अजय प्रकाश डिगे (वय २०, दोघे रा. बाणेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार तन्मय शितोळे (वय १८, रा. पाषाण), मयुर मेढे (वय १९) यांच्यासह त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. रतन सुग्रीव माने (वय २१) हा या घटनेत जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.याबाबत सुग्रीव शिवाजी माने (वय ५२, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना बाणेर रोडवरील गणराज चौकात सोमवारी रात्री दहा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा रतन हा सोमवारी पाषाण सूस रोडवर त्यांच्या ओळखीचा तन्मय शितोळे व इतरांनी अडवून तू रणजित रामगुडे या का फिरतो, तुला जास्त मस्ती आली आहे, या पुढे तू त्याचे बरोबर दिसला तर
तुला बघतोच अशी धमकी दिली. त्यानंतर काही वेळाने रतन दुचाकीवरुन घरातून बाहेर गेला.
बाणेर रोडवरील गणराज चौकात आला असताना त्याला शितोळे व इतरांनी अडवले.
शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यांनी लोखंडी हत्याराने रतन याच्या डोक्यात, पाठीवर सपासप वार केले. त्यात तो जखमी झाल्यावर ते पळून गेले.त्यानंतर रतन याला प्रथम औंध हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथून त्याला ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
रणजित रामगुडे त्याच्याबरोबर फिरतो, म्हणून विरोधी टोळक्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढिल तपास सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे तपास करीत आहेत