पुणे दि,१८ :- स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पुणे ग्रामीण पथकाकडुन शिरूर येथे तीन आरोपी यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल व काडतुसांसह केले जेरबंद मा.पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण श्री. संदीप पाटील साो. यांनी पुणे ग्रामीण जिल्हयामधील विनापरवाना, बेकायदा गावठी कटटे बाळगणारे व त्याव्दारे गंभीर गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेबाबत सुचना स्थानिक गु.अ.शाखा पुणे ग्रामीण वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पदमाकर घनवट साो. यांना दिले होते. श्री. धनवट सो यांचे आदेशाने पुणे अहमदनगर रोडवर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नेमुन अशा प्रकारचे विनापरवाना
अग्निशस्त्र बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. सदर पथकामध्ये सहा पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहा.फौजदार दत्तात्रय गिरमकर, सहा.फौजदार दयानंतद लिम्हण, पो.हवा.उमाकांत कुंजीर, पो.हवा, सचीन गायकवाड, पो.ना. राजु मोमीन, पो.ना. जनार्धन शेळके, पो.कॉ. बाळासाहेब खडके, प्रमोद नवले यांचे पथक तयार केले. त्याबाबत नमुद पथक हे शिरूर, शिकापुर, रांजणगाव एम.आय.डी.सी.परिसरामध्ये माहिती काढत असताना नमुद पथकास गोपनिय माहिती मिळाली की, शिरूर बायपास येथिल
रिलायन्स पंपाजवळ शिरूर कडे जाणारे रोडजवळ एक पांढरे रंगाची इंडीया कार एम.एच.१४ बी.आर. ६५६५यामधुन काही इसम गावठी कटटा घेवुन गंभीर गुन्हा करण्यासाठी येणार आहे अशी खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली. व शिरूर बायपास येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी सापळा लावला असताना तेथे एक पांढरे रंगाची इंडीका कार उभी असलेली दिसली. त्यावेळी पोलीस कर्मचारी इंडीका कारच्या दिशेने जात असताना, कार मधील दोन इसम पोलीसांना पाहुन कारमधुन खाली उतरून पळुन जात असताना त्यांचेवर पोलीसांनी झडप मारून त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांचे सोबत इंडीका कारमध्ये असलेल्या कार चालकाला देखील ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांचेकडे
कसुन चौकशी करता त्यांनी त्यांची नावे १) अजहर सबदर खान, रा. शिरूर भाजी बाजार मच्छी मार्केट जवळ ता,
शिरूर जि.पुणे २) प्रदिप श्रीकिशन तिवारी, रा. शिरूर साईनगर भिसे हौसींग सोसायटी, ता.शिरूर जि.पुणे,
३) सागर रामचंद्र धनापुरे, रा. सूर्यनगर तपोवन रोड जि. अहमदनगर, अशी असल्याचे सांगीतले. तेव्हा त्यांची
झडती घेता त्यांचे जवळ बेकायदा, बिगर परवाना दोन गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व तीन जिवंत काडतुस
आणि गुन्हा करतेवेळी वापरलेली इंडीका कार नं. एम एच १४ बी आर ६५६५ असा एकुण पाच लाख तीन हजार रूपये किमतीचे मालासह पोलिसांनी जप्त केला आहे आरोपींना पुढील कारवाई करीता शिरूर पो.स्टे. येथे हजर केले
असुन, त्यांचेवर बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी शिरूर पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील अधिक तपास शिरूर पो.स्टे. करीत आहे.
यातील अजहर खान याचेविरूध्द काही महिन्यापुर्वी शिरूर पोलीस स्टेशनला बेकायदा अग्निशस्त्र
बाळगळयाप्रकरणी गुन्हा दाखल होता. आता पुन्हा तो बेकायदा हत्यार बाळगताना मिळुन आलेला आहे. तरी शिरूर
तालका परिसरामध्ये अवैध्य शस्त्र बाळगणारे इसम हे स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर असुन त्याबाबत माहिती
संकलीत करून कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. संदीप पाटील साो, अपर पोलीस अधीक्षक बारामती श्री. जयंत
मिना साो. यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पदमाकर घनवट सो व त्यांचे पथकाने
केलेली आहे.