निरा नरसिंहपुर दि,१३:- निरा नरसिंहपुर परिसरातील शेतकरी राजाची चिंता वाढली विधानसभेचा निकाल दहा ते बारा दिवस होऊन सुद्धा सरकार स्थापन होत नाही त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली एकीकडे पाठीमागच्या काळामध्ये निरा आणि भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे झालेली शेतकऱ्यांची दैनंदिन अवस्था दुसरी बाजूलक्षात घेतली तर ओला दुष्काळ परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुस्कान झाल्यामुळे ऊस केळी फळ भाज्या फुलांच्या बागा कारले दोडका गवार कांदा लसुन डाळिंब अशा अनेक पिकांचे परतीच्या पावसामुळे पाणी साचल्यामुळे जास्तीत जास्त पिकांचे नुस्कान झालेले आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या डोळ्याला पाणी येऊन शेतकरी राजा विचारात करीत आहे की आत्ता सरकार स्थापन होईल कोणते सरकार कर्ज माफ करीलयाकडे लक्ष शेतकऱ्याची आहेशेतीच्या पिकाचे पंचनामे चालू आहे परंतु त्या पंचनाम्याचे जे अनुदान शेतकऱ्याला मिळणार आहेत तातडीने अनुदान शेतकऱ्याला त्यांच्या खात्यावर जमा होऊन मिळावे शेतकऱ्यांचा उतारा कोरा नाही केला तर आपण पुढच्या काळामध्ये आपण त्यांना त्यांची जागा दाखवू असा शेतकरी वर्ग बोलत आहे दोन्ही नद्यांना आलेल्या पुरामुळे पुराचे पंचनामे करून देखील शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही पंचनामा कागदावरच आहे असाही गरीब शेतकरी सांगत आहे
प्रतिनिधी बाळासाहेब सुतार तालुका इंदापूर पुणे