पुणे दि २४ :- पुणे शहरातील कडकडीत अवैध प्रकार बंद असताना बाणेर भागात रो-हाऊसमध्ये सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायावर चतुःशृंगी पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला आहे. चार महिलांची सुटका करत मॅनेजरला अटक केली आहे. सुरेश प्रल्हाद रणवीर (वय २५, रा. बाणेर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आस्थापना बंद होत्या. तर दुसरीकडे एकही अवैध प्रकार सुरू नसल्याचे सांगितले जाते. मात्र बाणेरमधील धनकुडे वस्तीलगत पाषाण टेकडीजवळ एका रो-हाऊसमध्ये महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती चतुःशृंगी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या माहितीची खातरजमा केली. तसेच बाणेर परिसरात सापळा लावून छापा टाकला. त्यावेळी येथे चार पीडित महिलाकडून जादा पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायास करून घेतला जात असल्याचे समोर आले. या पीडित महिलांची सुटका करीत सुरेशला अटक केली. चौकशीत त्याने महिलांना जादा पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याची कबुली दिली.व दि २३ रोजी रात्रौ २०/२० वा.रोजी गोपनीय बातमीदाराचे मदतीने बातमी मिळाल्याने बाणेर या ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी जादा पैशाचे अमिष दाखवुन वेश्या व्यवसाय चालक व मालक महिला आरोपी व तेथील मॅनेजर सुरेश प्रल्हाद रणविर , वय २५ वर्षे रा.बाणेर पुणे यांनी आपसात संगनमत करुन पिडीत ०४ महिला यांना सदर रो – हाऊसमध्ये वेश्य व्यवसायासाठी ठेवुननमुद पिडीत महिलांना जादा पैशाचे आमीष दाखवुनत्यांचेकडुन वेश्या व्यवसायापासुन मिळालेल्या रकमेतुन स्वतःची उपजिवीका भागवीत असताना पोलिसांना मिळुन आल्याने सदरठिकाणी वरील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकुन , तेथील मॅनेजर सुरेश रणविर यास व ०४ पिडीत महिला यांना ताब्यात घेवुन वरील वेश्या व्यवसाय चालक महिला व मॅनेजर यांचे विरुध्द चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन , मॅनेजर यास दि .२३ रोजी ०४.१५ वा अटक केली आहे . सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीसनिरीक्षक . अनिल शेवाळे , चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हे करीत असुन यातील पिडीत मुलींना ताब्यात घेवुन त्यांना मा.न्यायालयासमोर हजर करुन मा.न्यायालयाचे आदेशाप्रमाणे रेस्क्यु फाँडेशन मुंढवा येथे ठेवण्यात आले आहे . तसेच वेश्यव्यवसाय चालविणारी महिला आरोपी महिला हीचा पोलीस शोध घेत आहेत .
व सदर कारवाई सुनिल फुलारी , अपर पोलीस आयुक्त , पूर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर व पंकज देशमुख , पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -४ पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त , लक्ष्मण बोराटे , खडकी विभाग , पुणे शहर ,अनिल शेवाळे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , चतुःशृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर , वरिष्ठ निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे,व कर्मचारी पोहवा सतीश चव्हाण , पोहवा अरुण साबळे , पोशि सतीश पंडीत , मपोशि रुपाली भरेकर , मपोहवा स्मिता महाजन , पोहवा कुदळे , पोना अजय येवरीकर,नितीन यादव, यांच्या पथकाने ही कारवाई केली.