पुणे दि०४:- पुणे गोखले नगर परिसरात राहण्यास आसनारा एक विद्यार्थी मानसिकता खचलेल्या व आर्थिक अडचणीत अडकलेल्या विद्यार्थ्याने दि २७/०६/२०२० रोजी दुपारी अपर पोलीस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग सुनील फुलारी यांचे कार्यालयातील फोन केला व फोन वर स्वतःफुलारी यांनी उचलला,समोरून एक विद्यार्थी आपली हकीकत व्यक्त करत होता. ”सर मी upsc चा अभ्यास करत असून गोखलेनगर,पुणे येथे राहण्यास आहे,कोरोनामुळे सोबतचे मित्र गावी गेले आहेत,माझे घरची परिस्थिती बेताची असून खाण्यापिण्याचे हाल सुरू असून मानसिकता खराब होत चालली आहे,गावी जायलाही पैसे नाहीत. मला पोलिसांकडून मदत मिळेल अशी अपेक्षा आहे, असे सांगितले. त्यास फुलारी यांनी मदतीची हमी देऊन तात्काळ चतुःशृंगी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक,समीर चव्हाण यांना सदर विद्यार्थ्यास मदत करणेस कळविले. त्यास समीर चव्हाण यांनी वैद्यकीय तपासणी करून घेऊन इ पास साठी मदत करून दिनांक २९/०६/२०२० रोजी त्याचे मूळगावी सोलापूर येथे पाठविले. सदर मदतीमुळे या विद्यार्थ्याने पोलीस प्रशासनाचे कायम आभारी राहील,अशी भावना व्यक्त केली आहे”