बिड दि ११ :- झुंजार नारी मंच च्या सचिव सौ. आशा वरपे यांच्या संकल्पनेतुन आयोजित मिस झेड.एन.एम. फॅशन आयकॉन २०२० या ऑनलाईन ब्युटी कॉन्टेस्टचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाड्यात पहिल्यांदाच अशा अफलातुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना विषानु संसर्गाच्या
अनुशंगाने सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात मुलींना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणुन हा संपुर्ण कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला. ज्यात स्पर्धकांनी सहभाग ऑनलाईन घेतला, त्यांचे सर्व राऊंडही ऑनलाईनच घेण्यात आले व निकालही ऑनलाईनच प्रसिध्द करण्यात आला.
कार्यक्रम संपुर्ण नियोजनबध्द आणि खुपच आकर्षक स्वरुपातील मांडणीचे कौतुक सर्वच स्थरातुन झाले. कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन सौ.आशा वरपे यांनीच केले होते.
मिस झेड.एम.एन. फॅशन आयकॉन २०२० यास्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे व परिक्षक म्हणुन डॉ.सौ.पुजा कारंडे (मिसेस वेस्ट इंडिया-2018 मध्ये मिसेस ईटेलिजन्स) या लाभल्या होत्या. या फॅशन आयकॉन मध्ये १२ स्पर्धकांनी भाग घेतला त्यामधुन विनर म्हणून कु.गायत्री देशमुख, बीड.फस्ट रनरअप कु.श्रुती आग्रवाल, बीड.सेकंट रनरअप कु.अबोली वडमारे, बीड.
हे स्पर्धक यशस्वी झाले आहेत.