पुणे ग्रामीण दि १२ : – पुणे वडगाव मावळ परीसरातील डोंगशीन कंपनीचां मॅनेजर त्रास देत असल्याने त्या मॅनेजर ला ४ जणांनी मिळून हॉकी स्टिक घेऊन शिवीगाळ दमदाटी करून मारल्याची घटना ३० जुलै रोजी वडगाव मावळ परीसरात घडली होती.यातील तीन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबी पथकाने अटक केली आहे.
करणकुमार चल्ला मत्तु (वय २३ रा. गांधीनगर देहुरोड),बालाजी रमेश मुदलीयार (वय २७ रा. MB कॅम्प देह रोड),राकेश शिवराम पेरूमल (वय २५ रा. MB कॅम्प देहुरोड) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी मुथया सुबय्या बडेदरा (वय ५७ र. टाटा हौसिंग सोसायटी, वडगाव मावळ) यांनी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे तळेगाव एमआयडीसी परीसातील डोंगशीन कंपनीत मागील दोन महिन्यांपासून सीनियर जनरल मॅनेजर पदावर रुजू झाले आहेत. ते ३० जुलै रोजी त्यांच्या सुझुकी एस क्रॉस कार मधून घरी चालले होते. विशाल लॉन समोर मोटर सायकलवर दोन व्यक्ती येऊन त्या गाडीची धडक दिली व आणखी दोघे जण येवुन हातात हॉकी स्टिक घेऊन शिवीगाळ दमदाटी करून मॅनेजरला दोन्ही पायाच्या नडगीवर जोरात मारून दुखापत केली व फ्रेक्चर केले. याप्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या गुन्ह्याचा समांतर तपास एलसीबीचे पोलिस करत होते. एलसीबीने तांत्रीक कौशल्याने तपास करून आरोपींचे नावे निष्पन्न केली आणि त्यांनी देहूरोड भागातून ताब्यात घेतले.त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता अटक केलेल्या तिन्ही आरोपींनी त्यांचा चोथा साथीदार मुस्ताक जमील शेख (वय २५रा. गांधीनगर देहुरोड)याच्यासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे सागितले.
तसेच आशिष ओव्हाळ( रा.विकास नगर ,देहूरोड,पुणे) याने आरोपींना सुपारी दिली होती.आशिष तळेगाव एमआयडीसी परीसातील डोंगशीन कंपनीत काम करतो.त्याने सिनियर मॅनेजर त्रास देत असल्याचे सांगून दीड लाखाची सुपारी दिली. ही सुपारी फक्त फॅक्चर करण्यासाठी होती असे आरोपीने सागितले.
मुस्ताक शेख याला कोरोना झाला असल्याने तो रूग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. कोरोना मधून बरा झाल्यावर त्याला अटक करणार असल्याचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सागितले.आरोपींना पुढील कारवाई साठी वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा नवनीत कावत , पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली API पृथ्वीराज ताटे, ASI विजय पाटील, HC प्रकाश वाघमारे, HC सचिन गायकवाड PN गणेश महाडिक स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे