पुणे दि २७ :- बढाई आळी येथील बढाई समाज ट्रस्टच्या श्री गणेशाची आरती कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांची सेवा केली असे कोरोना योद्धा फरासखाना पोलिस स्टेशनच्या गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादा गायकवाड व रविवार पेठ पोलिस स्टेशन गुन्हे विभागाचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.या प्रसंगी समाजाचे अध्यक्ष शैलेश बढाई,प्रशांत बढाई,दिनेश बढाई,रवी सहाणे,घनश्याम बढाई,मनोज बढाई,रमेश बढाई,भरत बढाई,पवन बढाई,विलेश बढाई,रफिक रंगरेज,मुजीब रंगरेज,आदि मान्यवर उपस्थित होते.बढाई समाज गणेश हा पुण्यातील पहिला समाज गणेश असून त्याची स्थापना १८९३ साली लोकमान्य टिळक यांच्या हस्ते झाली असे शैलेश बढाई यांनी नमूद केले.