पुणे दि २७ :- पुणे रविवार पेठेतील तीन दुकानांचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईताला फरासखाना पोलिसांनी दि १८ रोजी अटक केली होती व. त्याच्याकडून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. विकास उर्फ विकी उर्फ जंगल्या दिलीप कांबळे (वय २६, रा. कुदळवाडी, चिखली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.विकास उर्फ विकी उर्फ जंगल्या हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात विविध प्रकारचे तब्बल ३२ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान रविवार पेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता.त्यानुसार फरासखाना पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत होता. चिखली परिसरातील कुदळवाडीकडे जाणाऱ्या एका पेट्रोलपंपावर आरोपी मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदाराच्या मदतीने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त साो . पश्चिम प्रादेशिक विभाग , पुणे शहर डॉ . संजय शिंदे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ १ , पुणे श्रीमती स्वप्ना गोरे , सहाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे. मिलिंद पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली . जगन्नाथ कळसकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , फरासखाना पोलीस स्टेशन , पुणे . दादा गायकवाड , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , पोलीस उप निरीक्षक यशपाल सुर्यवंशी , मपोउपनि तेजस्वी पाटील व पोलीस कर्मचारी सयाजी चव्हाण , आकाश वाल्मीकी , मोहन दळवी , सचिन सरपाले , यांनी केली आहे . दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्रीमती तेजस्वी पाटील या करीत आहेत .