पुणे दि 31:-राज्यातील वाढते दलित अत्याचाराचे प्रमाण,आदिवासी अत्याचार,आदिवासी कल्याण निधीचे वर्गीकरण,अत्याचारग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन अद्याप झालेलं नाही,न्यायप्रक्रियेतील विलंब ,राजगृहावरील हल्ला ,स्मारके ,खाजगी क्षेत्रातील आरक्षण आदी विषयांवर भीम आर्मी महाराष्ट्र च्या वतीने मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.दि 3 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान भीम संघर्ष मार्च चे आयोजन करण्यात आले आहे .3सप्टेंबर ला दुपारी 12 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुणे स्टेशन येथून मार्च सुरू होणार असून मुंबई पुणे जुना मार्ग ते पनवेल ,चेंबूर मार्गे 7 सप्टेंबर रोजी हा मार्च मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाणार असल्याचे भीम आर्मी चे अध्यक्ष दत्ता पोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.या भीम संघर्ष मोर्चा साठी महाराष्ट्रातील जातीय अत्याचाराच्या घटनांचा चित्ररथ तयार करण्यात आला असून महाराष्ट्रातील अत्याचार ग्रस्त आणि पिढीत कुटुंबातील काही सदस्य उपस्थित राहणार आहे