पुणे दि ०९ :- कोरोन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी निर्गमित केलेल्या आदेशान्वये पुणे शहरातील जीवनावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा व्यतिरिक्त दुकाने, मार्केट, हॉटेल टप्पे निहाय सुरु करण्यात आलेली आहेत. हॉटेल मध्ये येत असलेल्या नागरिकांनी मुख पट्टी (फेस मास्क) वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे इत्यादी बंधनकारक करण्यात आले आहे.
वेळोवेळी निर्गमित आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत असून काल दि. ८/१०/२०२० रोजी पुणे
महानगरपालिकेच्या वतीने धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे पुणे महापालिका सहायक आयुक्त निलेश देशमुख यांचे नियंत्रणाखाली कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई मध्ये पुणे सातारा रोड येथील हॉटेल सौरभ, हॉटेल बासुरी, हॉटेल नवरत्न, हॉटेल अभी किचन, हॉटेल जगात भारी कोल्हापुरी या हॉटेलवर मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या प्रकरण १४ कलम ३(ए) व ४ आणि कलम ४४ आणि कलम ३७६ अन्वये शहर स्वच्छता व नियोजन कायद्या अंतर्गत अस्वच्छता आणि उपद्रव निर्माण करून गैरसोय करणे या अधिनियमान्वये व साथरोग नियंत्रण कायद्यानुसार हॉटेल अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे प्रत्येकी २ हजार ५०० रुपये- असा एकूण १२ हजार ५००/- इतका दंड वसूल करण्यात आला. आहे तसेच शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडील महापालिका सहायक आयुक्त आशा राऊत यांचे नियंत्रणाखाली नागरिकांनी मुख पट्टी (फेस मास्क) न वापरणे, सामाजिक अंतर न ठेवणे या करिता साथरोग नियंत्रण कायद्यानुसार नागरिकांकडून र.रु. १८ हजार रूपये इतका दंड वसूल करण्यात आला.आहे