पुणे ग्रामीण दि २८ :-पुणे लोणावळ्यातील माजी शिवसेना शहर अध्यक्ष राहुल उमेशभाई शेट्टी यांची जयचंद चौक लोणावळा येथील येवले चहाचे दुकानाशेजारी यांचेवर गोळ्या झाडुन व धारदार शस्त्राने वार करून , त्यांचे झालेले खुनाचा अत्यंत गंभीर गुन्हा घडलेमुळलेमुळे पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख , अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील , सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी नवनीत कॉवत यांनी तात्काळ लोणावळा येथे येवुन गुन्हयाचा अत्यंत शिघ्र तपासकार्य चालू केले होते . व चोवीस तासातच हत्या प्रकरणातील हल्लेखोर पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात आरोपी इब्राहीम युसूफ खान (वय-३०, रा. सैय्यदनगर, हडपसर, मूळ रा. शहावली मोहल्ला कब्रस्थानसमोर, लातूर) व मोहन उर्फ थापा देवबहाद्दुर मल्ला (वय-४७, रा. बॅटरीहिल, खंडाळा, मूळ रा. लुंबिनी, नेपाळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. इब्राहीम खान याने शेट्टी यांच्यावर प्रत्यक्ष हल्ला केल्याचा संशय आहे. लोणावळा पोलिस उपविभागीय अधिकारी व साहय्यक पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी ही माहीती दिली.शेट्टी हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या चार झाली असून अन्य तीन संशयीत फरारी आहे.शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष राहुल शेट्टी यांची सोमवारी (ता.२६) सकाळी त्यांच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या झाडत हत्या करण्यात आली होती. शेट्टी यांच्या पत्नी सौम्या शेट्टी यांनी फिर्याद दिली होती.
त्यानुसार सुरज आगरवाल ( वय-४२, रा. लोणावळा), दीपाली भिलारे (वय-३९, रा. लोणावळा) या दोघांना घटनेच्या दिवशीच पोलिसांनी अटक केली होती. तर अज्ञात हल्लेखोरासह मोबिन इनामदार (वय-३५, रा.भैरवनाथ नगर, कुसगाव लोणावळा), कादर इनामदार (वय-३३, भांगरवाडी , लोणावळा), सादिक बंगाली (वय-४४, गावठाण, लोणावळा) आदींवर गुन्हा दाखल झाला होता. हल्लेखोराचा माग काढण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.गोपनीय बातमीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माहीती घेत स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा शहरच्या कर्मचाऱ्यांनी शेट्टी यांचा हल्लेखोर इब्राहीम व मोहन मल्ला यास पुण्यातून अटक केली. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, सहायक पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकातील पोलीस नाईक नितिन सुर्यवंशी, अमित ठोसर, वैभव सुरवसे, मनोज मोरे, राजेंद्र मदने, अजिज मेस्त्री, राहुल खैरे, पवन कराड यांच्या पथकाने ही हल्लेखोरास शिताफीने पकडले.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पुण्यात सापळा लावत दोन्ही मुख्य आरोपी ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून हत्येच्या कारणांचा तपास सुरु असून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करावयाची असल्याचे. काँवत म्हणाले. अत्यंत संवेदनशील अशा घटनेचा चोवीस तासात छडा लावत हल्लेखोरांना अटक केल्याप्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी तपास पथकास वीस हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले असल्याचे काँवत म्हणाले.
हत्येमागील राजकीय कारणांचाही शोध : मनोजकुमार यादव- शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आलेला मोहन मल्ला हा शिवसेनेचा शाखाप्रमुख राहीला आहे. तर दीपाली भिलारे हीने युवती सेनेचे तालुका संघटक पद भुषविले आहे. गुन्हा दाखल झालेल्यामंध्ये काही शिवसेना पक्षाशी संबधित आहे. मल्ला याने हत्येत सहभाग घेतला असल्याने राहुल शेट्टी यांच्या हत्येमागे काही राजकीय वैमनस्य आहे का? राजकीय व्यक्तींचा हात आहे का? या कारणांचाही पोलिस तपास करत आहेत अशी माहीती पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.