पुणे ग्रामीण दि २१ :- पुणे ग्रामीण परिसरात दरोडा टाकून धुमाकूळ माजवणारा गुन्हेगार २ वर्षापासून फरार असलेला रेकॉर्डवरील आरोपी पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आदेशाने रेकॉर्डवरील पोलिसांना पाहिजे, आसलेला फरार आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना, दि २० नोव्हेंबर रोजी दौंड पोलीस स्टेशन येथील दरोडयाच्या गुन्हयातील दोन वर्षापासून फरारी असलेला रेकॉर्डवरील पाहिजे असलेला आरोपी नामे माऊली बंटया भोसले वय २१ वर्षे रा.बेटवाडी ता.दौंड जि.पुणे हा दौंड नगर मोरी चौक येथे येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाल्या नुसार त्या ठिकाणी सापळा रचून तो पळून जात असताना त्यास पाठलाग करून ताब्यात घेण्यात आलेले आहे.सदर आरोपी याचेवर यापूर्वी श्रीगोंदा पो.स्टे. जिल्हा अहमदनगर येथे गुन्हा दाखल आहे.सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. पृथ्वीराज ताटे,पोहवा. महेश गायकवाड,पोहवा.निलेश कदम,
पोहवा.सचिन गायकवाड,पोना. गुरू गायकवाड,
पोना. सुभाष राऊत यांनी केलेली आहे.