नागपूर दि ०८ :- महान संत जगनाडे महाराज यांची 396 वी जयंती केवळ मराठीच्या नव्हे तर सर्व भारतीय भाविकावर त्यांनी कुटुंबवत्सलतेचा संस्कार निर्माण केला, ज्ञान हिच जीवनाची गुरूकिल्ली असे त्यांनी सांगितले. अशा या महान संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी चाकणजवळच पुणे जिल्ह्यात झाला. ते अवघ्या 10 वर्षाचे असतांना तुकाराम महाराजांच्या विचारांना प्रेरित होऊन. समाजाला उपदेश करत भक्ती हि श्रेष्ठ उच्चारीत, भेदभाव नाही, अंधश्रद्धा, पाखंडीपणा, बुवाबाजीवर प्रहार करीत संताजी
जगनाडे महाराज या विचारांनी प्रेरित झाले होते.
प्रारंभी तुकाराम महाराजांच्या टाळकर्यामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. त्यांना उद्देशून तुकाराम महाराज म्हणत ” संताजी तेली बहुत प्रेमळ / अभंग लिहित बसे जवळ ”
पुण्याच्या तुळशीबागेत तुकाराम महाराजांच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज आले असता त्यावेळी संताजी महाराज हे शुद्धा तेथे उपस्थित होते. संताजी महाराजांनी लिहलेली गाथा इंद्रायणी नदीत बुडविली हे कळताच तुकाराम महाराजांनी अन्न पाणी सोडून दिले होते. त्यावेळी संताजी महाराजांनी गावोगावी जाऊन ती गाथा मुखपाठाने जनजागृती करून तुकाराम महाराजांचे उपोषण सोडवले. आज अठरा भाषेत, तेरा देशात तुकाराम महाराजांची गाथा जिवंत आहे. त्यामागे तुकाराम महाराजांचे अमुल्य योगदान आहे. अशा या तेली समाजाचे आराध्य दैवत असलेले संत संताजी जगनाडे महाराज यांच्या 396 व्या जंयती निमित्ताने स्थानिक जगनाडे चौक येथे त्यांच्या प्रतिमेला हार अर्पीत करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नागपूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा प्रज्ञा ताई बडवाईक, समाजाचे अविभाज्य अंग असलेले माजी नगरसेवक आ.सतीश देऊळकर, अखिल विदर्भ तेली समाज संघटना व वर वधू सुचक मंडळाचे विदभॅ अध्यक्ष आ. अरूण धांडे, महासचिव राजेश कारमोरे, सोहन सातपुते, विकास अर्बन बॅकेचे अध्यक्ष दिलीपजी सुरकर, संचालक आ. सुभाष ढगे, दिवेश गायधने, कृतल आकरे, मोहनजी आगासे, कृष्णाजी कामडी, पलाश मस्के, पियुष आकरे प्रामुख्याने उपस्थित होते.