पुणे, दि.१२ :- १ जानेवारी २०२१ या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांच्या अनुषंगाने विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज वाघोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ येथे प्रत्यक्ष भेट देवून मतदार नोंदणी कक्षाची पहाणी केली.
जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी मतदार नोंदणी करतांना केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी चुका होणार नाही तसेच यादीतील दुबार नावे वगळावे, अशा सूचना केल्या.यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार सुनील कोळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच महेंद्र भांडाले, ग्रामसेवक अनिल कुंभार, मंडळ अधिकारी किशोर शिंगोटे, केंद्रस्तरीय मतदार नोंदणी कक्षातील कर्मचारी स्वप्नील बडगे, स्वप्नील सातव, दीपक शिंदे, महेश उदार, गणेश गाडेकर सविता भालचिम, माधुरी लोधी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
या विशेष पुनरिक्षण मोहिमेंतर्गत मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या, कृष्ण धवल व अस्पष्ट छायाचित्र असलेल्या मतदारांचे रंगीत छायाचित्र गोळा करण्याची मोहिम मतदार संघस्तरावरुन राबविण्यात येत असून नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. कुटुंबातील मयत झालेल्या व्यक्ती, दुबार नावे असलेले मतदार व स्थलांतरीत झालेल्या मतदारांनी विशेष मोहिमांच्या वेळी फॉर्म ७ भरून देऊन मतदार यादीतील नावांची वगळणी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही
जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी केले.