पुणे ग्रामीण दि ३१ :- पुणे कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी बंदोबस्ता साठी पोलिस पेट्रोलिंग करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळलेल्या गोपनीय माहिती मिळाली कि लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत एक ओमीनी कार क्र TN 55 V2682 या गाडी मध्ये संशयित इसम येत असल्याचे माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने सापळा रचून गाडी ताब्यात घेतली असता गाडीतील सहा संशयित इसम मिळून आले त्यांची नावे १) गणेशन पेयांडी तेवर वय ४८ वर्षे रा साऊथ स्ट्रीट , कोसवा पट्टी कोडी कुलम जि मधुराई राज्य तामिळ नाडू , २)शिवकुमार करपैया तेवर वय ३९ वर्षे रा किलपट्टी नादुमाले कुलम ता उसलामपट्टी जि मधुराई राज्य तामिळनाडू ३) पंडियेन सेहदू वैकट वय ३२ वर्षे रा रामनाड ता रामानदापुरम जि रामेश्वरम राज्य तामिळनाडू 4)सरवान गणेशन लचामी वय ३० वर्षे रा सिक्कान्ड जि मधुराई राज्य तामिळ नाडू 5) गणेशन ओच्च तेवर वय ४५ वर्ष रा कोडीकुलम ता उसलमलामपट्टी जि मधुराई राज्य तामिळनाडू ६) सेलवराज अंथन उनिखंडी वय ३३ वर्षे रा येदनकुलम ता मधूकुलसर जि रामनदापुरम राज्य तामिळनाडू वरील सर्व इसमाना ताब्यात घेऊन त्यांच्या कडे कसून चौकशी केली असता तसेच त्यांचे ताब्यातील गाडीमध्ये विविध कंपनीचे ६ मोबाईल तसेच २ लहान मोठे लोंखंडी कोयते तसेच लोंखंडी पक्कड, स्क्रू ड्रायव्हर , लोखंडी पान्हे , तसेच एकूण ११ तोळे ७०० ग्रॅम सोन्याचे दागिने १०० ग्रॅम चांदीचे दागिने तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली ओमीनी कार जप्त करण्यात आली आहे सदरची टोळी ही पुणे नगर हायवे वर सिगारेट च्या गाडीवर दरोडा टाकून लुटण्याचा तयारीत होती सदरच्या टोळी कडून एकूण ८ लाख ३८ हजार ६३८ रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .सदरचे आरोपी मुद्देमालसह पुढील तपास कामी लोणीकंद पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे . सदरची कारवाई ही ,पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख , अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस वरिष्ठ निरीक्षक पद्माकर घनवट , लोणीकंद पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर सहा पो नि पृथ्वीराज ताटे , मनोज नवसरे ,पो स ई शिवाजी ननवरे ,पो स ई हनुमंत पडळकर
सहा फो दत्तात्रय जगताप, दत्तात्रय गिरमकर , राजेंद्र थोरात, पो हवा मुकुंद आयचीत , राजू पुणेकर, निलेश कदम, महेश गायकवाड, ,उमाकांत कुंजीर , ज्ञानेश्वर क्षीरसागर, प्रमोद नवले
पो ना विजय कांचन , राजू मोमिन, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, नितीन भोर, जनार्दन शेळके, पो कॉ बाळासाहेब खडके, धिरज जाधव, पो कॉ उमेश कुतवळ अक्षय जावळे , दगडू वीरकर यांनी केली आहे