पुणे, दि.१३ :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय पुणे मार्फत चालू अर्थिक वर्षात अनुसूचित जातीतील महार, नव बौध्द, बुरुड,भंगी, हिन्दु-खाटीक इत्यादी जातीतील पात्र उमेदवारास टु व्हीलर सर्व्हिस सेंटर, ब्युटी पार्लर, डिप्लोमा, जी.एस.टी, संगणक प्रशिक्षण, फेब्रिकेशन/ वेल्डीग, वाहन चालक मोबाईल रिपेंरींग, फॅशन डिझायनिंग, नेफ्रीजेटर ॲड ऐअर कंडीन्शर रिपेंरीग, मोटार रिवायडींग, रिटेल मॅनेजमेंट इत्यादी व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या व्यवसाय प्रशिक्षणासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनिंग कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, इत्यादीसह जिल्हा कार्यालय, 424 मंगळवार पेठ, लडकत पेट्रोल पंपाजवळ पुणे. दुरध्वनी क्र.020-26121295 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत बनसोडे यांनी केले आहे.