पुणे,दि. २७: अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे अंतर्गत एकुण अकरा परिमंडळ कार्यालय कार्यरत असून अकरा परिमंडळ कार्यालयाअंतर्गत असलेल्या सर्व शासनमान्य रास्तभाव दुकानांमध्ये प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला अन्नदिन, अन्नसप्ताह ७ ते १५ तारखेस व सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम साजरा करण्यात येतो. या दिवशी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करुन पदाधिकारी व मान्यवरांव्दारे शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरीत करण्यात येते. सर्व शिधापत्रिकांनी याची नोंद घेऊन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमती अस्मिता मोरे यांनी केले आहे.
००००