पुणे दि २३ :- गुरुपौर्णिमा सर्वत्र साजरी होत असताना पर्वती भागातील जनता वसाहत येथील अगरवाल हायस्कूल येथे इयत्ता 2 री मध्ये शिकणारी समीक्षा शिवाजी कदम या गरीब कुटुंबातील बालिकेस सामाजिक कार्यकर्ते अमित बागुल यांनी शिक्षणात खंड पडू नये म्हणून चक्क नवा मोबाईल भेट दिला. आणि त्या बालिकेच्या दृष्टीने अनोखी गुरुपौर्णिमा साजरी झाली. यासंदर्भात पर्वती भागातील जनता वसाहत येथील यार्डी संस्थेत काम करणारे विजय गायकवाड यांनी या मुलीचे शिक्षण अँड्रॉइड फोन नसल्यामुळे खंडीत झाले असल्याचे अमित बागुल यांना सांगितले या मुलीचे वडील इलेक्ट्रिशन असून गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे हाताला काम नसल्याने घरातील परिस्थिती अतिशय बेताची आहे. व आईदेखील घरकाम करून संसाराला हातभार लावते. मात्र त्यांना मुलीला शिक्षणासाठी अँड्रॉइड फोन घेऊन देणे परवडणारे नव्हते त्यामुळे त्या बालिकेचे शिक्षण खंडित झाल्याचे गायकवाड यांनी सामाजिक कार्यकर्ते व पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल यांना कळवले व या बालिकेस एखादा जुना फोन देता येईल का त्यामुळे तिचे शिक्षण सुरू होईल असे सुचवल्यावर त्यावर अमित बागुल यांनी जुना कशाला आपण त्यांना नवीनच मोबाईल देऊ व त्या मुलीच्या घरी कार्यकर्त्यांसोबत जाऊन त्या मुलीला नवीनच मोबाईल भेट दिला. नवीन मोबाईल मिळाल्याचे पाहून त्या मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले ते पाहून सर्वांचेच मन हेलावले. याप्रसंगी अमित बागूल यांच्या समवेत विजय गायकवाड,संतोष गेळे,महेश ढवळे,धनंजय कांबळे,ओंकार उपाध्ये,सागर आरोळे,राहुल जाधव, गणेश गुंजाळं, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.गुरुपौर्णिमा साजरी होत असताना गरीब विद्यार्थ्यांना अँड्रॉइड फोन नसल्यामुळे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे गुरु शिष्याचे नाते आहे त्याच्यावर कोरोनाची दाट छाया पडली आहे. गरीब कुटुंबातील मुलांनाही शिकवलं पाहिजे त्यांची इच्छा देखील आहे मात्र आधुनिक साधने नाहीत त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहत आहेत. म्हणून त्या बालिकेला नवीन मोबाईल दिल्यामुळे तिचे शिक्षण सुरू राहील आणि अशा पद्धतीने ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी गरजू गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी फोन द्यावे असे आव्हान अमित बागुल यांनी केले.
याप्रसंगी या बालिकेच्या आई-वडिलांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि या नवीन मोबाईल मुळे आपले शिक्षण सुरू राहणार त्यामुळे आनंदित झालेल्या मुलीने सर्वांना वाकून नमस्कार केला त्या वेळी सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. तिला भावी शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन व आशीर्वाद देऊन हा कार्यक्रम संपला.आगळ्यावेगळ्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी झाली याचा आनंद सार्यांनाच झाला.