पुणे, दि.२८ :- पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सर्व क्षेत्रीय कार्यालयांना प्रति दिन 10 लाख रूपयांच्या दंडाच्या वसुलीचे टार्गेट देण्यात आले होते. त्याबाबतचा आदेश उपायुक्त माधव जगताप यांनी काढला होता. दरम्यान, पुणे मनपाच्या आदेशाबाबातचे वृत्त काही ऑनलाइनने मीडियाने प्रसिध्द केले.त्याचे तीव्र पडसाद उमटले होते.व त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सदरील आदेश ताबडतोब रद्द करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. तसेच 10 लाख रूपये दंड वसुलीचे उद्दिष्ट कशाच्या आधारे दिले याचा खुलासाही मागविला आहे. सदरील आदेशात दंडाची रक्कम नजरचुकीने नमुद करण्यात आल्याचे आता उपायुक्त माधव जगताप यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
उपायुक्त माधव जगताप यांनी प्रति दिन 10 लाख रूपयाचे दंड वसुल करण्याचे आदेश दि. 25 ऑगस्ट रोजी काढले होते. आदेशाचे पालन करत अनेक ठिकाणी जोरदार वसुली सुरू होती.शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी कारवाई सुरू होती. दरम्यान, मनपाकडून केल्या जाणार्या वसुलीचा पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे
तीव्र निषेध करण्यात आला. त्याबाबतची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली होती.व आदेशाचे तीव्र पडसाद उमटताच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सदरील आदेश
ताबडतोब रद्द करण्याच्या सुचना दिल्या आहेत तसेच उपायुक्त माधव जगताप यांनी दंडाच्या रक्कम नजरचुकीने नमुद करण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या आदेशावर पडदा पडला आहे.