श्रीगोंदा,दि ०१ :-श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव शिवारात आज (शुक्रवारी) दुपारी बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे शेतकरी वर्गासह ग्रामस्थांत भिंतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाचे कर्मचारी यांना भ्रमणध्वनीवर कळवली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथील शेतकरी सयाजी साबळे हे शुक्रवारी दुपारी शेतात गेले होते. यावेळी कोरेगावालगत लागून असलेल्या त्याच्या मकेच्या शेतामध्ये त्यांना अचानक बिबट्या दिसला.त्यानंतर बिबट्याचे दृश्य शेतकऱ्यांनी मोबाईलच्या कॅमेरात टिपले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर हा बिबट्या मकेच्या शेतात दबा धरून बसला असून त्यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर वन विभागाचे भोगे यांना माहिती दिली व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावला असून त्यानंतर ग्रामस्थ व वनकर्मचारी यांनी बिबट्याची शोधाशोध चालू केली पण अंधार पडल्यामुळे बिबट्या ची शोधमोहीम थांबवावी लागली.
कोरेगाव शिवारात बिबट्या आल्याने सर्व ग्रामस्थानी सतर्क होणे गरजेचे आहे. रानावनात एकटे कुणीही भटकु नये. महिलांनी घराबाहेर पडू नये. फटाके वाजवावेत.भोगे साहेब, वन कर्मचारी श्रीगोंदा