पुणे,दि ३० :- पर्यटन व्यवसायाचा पुनश्च हरि ओम झाल्यानंतर प्रथमच सुमारे दीड वर्षानंतर पर्यटनाशी निगडीत समस्या, आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते.अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या समस्या, यापुढे कशा टाळता येतील, व त्यावर कशी मात करता येईल आणि जोमाने एकत्रितपणे कसे काम करता येईल या विषयावर चर्चा झाली.कार्यक्रमात सुप्रिया करमरकर दातार उपसंचालक, पर्यटन महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी पर्यटन संचालनालय करीत असलेल्या उपाय योजना व पर्यटन दूत याबद्दल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बोलताना दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे यांनी महामंडळाच्या पर्यटक निवासातील
सुविधा आणि अमलात आणलेल्या नवीन संकल्पना आणि सेवांबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांच्या प्रयत्नामुळे पर्यटन क्षेत्रात आलेल्या नवीन वर्क फ्रॉम नेचर या संकल्पनेची माहिती दिली…
सुशांत भंडारी, दुबई टुरिझम, यांनी दुबईमध्ये नुकत्याच चालू झालेल्या दुबई एक्सपो संदर्भात उत्कृष्ट सादरीकरण केले व उपक्रमाबद्दल पर्यटन व्यवसायिकांना मार्गदर्शन केले, शनाया मेहता ,वि. फ. स. पुणे व, त्याचप्रमाणे भारतातील सर्व अंतर्देशीय विमान कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी पर्यटन व्यवसायशी असणाऱ्या समस्यां बद्दल व सध्य परीस्थितीतील अद्यावत उपायोजना बद्दल मुक्त संवाद साधण्यात आला.या कार्यक्रमात टॅपचे अध्यक्ष दीपक पुजारी यांनी ऑनलाईन स्वागत केले, टॅप चे फाउंडर अध्यक्ष डॉ. विश्वास केळकर यांनी टॅप ची सुरुवात आणि आत्तापर्यंतचा प्रवासा याबद्दल मार्गदर्शन केले. निलेश भन्साळी यांनी टॅप तर्फे केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला व पुढील वाटचालीचा रोड मॅप सर्वांसमोर ठेवला, त्याच प्रमाणे प्रमोद शेवडे व निशिता घाडगे यांनीही न्यू नॉर्मल नंतर पर्यटन व्यवसाय या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित पंडित- संचालक , कृष्णा गायकवाड, अमित पवार, पायल जोशी व शशांक कुलकर्णी यांनी प्रयत्न केले.