पुणे दि १५ :-एस.पी.राेबाेटिक्स मेकर लॅबमध्ये शिकणाऱ्या लहान मुलांनी राेबाेट तयार केला असून या राेबाेटच्या माध्यमातून वाहतुक नियमन करणे शक्य हाेणार आहे.आजपर्यंत विविध काम करणारे राेबाे आपण पाहिले आहेत. परंतु पुण्यात६ वी ते ८ वी च्या मुलांनी चक्क वाहतुक नियमन करणारा राेबाे तयार केला आहे. या राबाेचे प्रात्याक्षिक पुणे पाेलीस आयुक्तलयात करण्यात आले. यावेळी पुण्याचे पाेलीस आयुक्त डाॅ. कें. व्यंकटेशम, वाहतुक पाेलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, विद्यार्थी, नागरिक उपस्थित हाेते.
एस पी राेबाेटिक्स या संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या ६ वी ते ८ वी विद्यार्थी , आदी कांचनकर, पार्थ कुलकर्णी सचित जैन शौर्य सिंह श्रतेन पांडे, विनायक कृष्णा या विद्यार्थ्यांनी हा राेबाेट तयार केला आहे. गेल्या दाेन महिन्यांपासून या राेबाेटवर काम करण्यात येत हाेते. सहा मुलांनी हा राेबाेट तयार केला आहे. हा राेबाेट माेबाईलवर ऑपरेट केला जाताे. या राेबाेट वाहनचालकांना थांबण्याची आणि जाण्याची सुचना करताे. तसेच ताे प्रत्येक काेठेेही वळू शकताे. सध्या हा राेबाेट प्राथमिक अवस्थेत असून काळानुरुप यात बरेच संशाेधन करण्यात येणार आहे. त्यानंतर हा राेबाेट वाहतूक पाेलिसांच्या मदतीस येणार आहे. या राेबाेटच्या माध्यमातून उन्हात उभं राहून वाहतूक नियमन करण्याची गरज पाेलिसांना भासणार नाही. या राेबाेटच्या माध्यमातून वाहतूक नियमन करता येणे शक्य हाेणार आहे.