चोरीत एक सज्ञान व दोन विधीसंघर्षित बालकांचा सामावेश
कर्जत,दि.०८ :- शेतकऱ्यांच्या कृषी पंपांवर डल्ला मारून त्यांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या व हे पंप भंगारात विकुन मालामाल होणाऱ्या चार आरोपींवर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात दोन विधीसंघर्षित बालकांचाही सामावेश असुन कृषिपंप भंगारात विकत घेणाऱ्या एका भंगार व्यावसायिकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे राशिन (ता. कर्जत) येथील साईराज मोटार रिवायडिंग या दुकानाच्या पाठीमागील उघड्या असलेल्या गोडावुनमधुन वेगवेगळ्या कंपनीच्या अंदाजे ६० हजार (जुन्या वापरत्या) किमतीच्या पाणबुड्या व इलेक्ट्रिक मोटारी दोन विधीसंघर्षित बालक आणि अजय आप्पा पानसरे वय-१९ (सर्व रा.राशीन ता.कर्जत) आदींनी चोरून त्या इबारत मुस्तकीम शेख वय-३० (रा.भिगवण ता.इंदापुर) या भंगार व्यावसायिकास विक्री केल्या. याबाबत राहुल आबासाहेब जांभळकर वय-३० वर्षे (रा.जांभळकरवस्ती,राशिन ता कर्जत) यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात भा.द.वी कलम ३७९,४११,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील अजय आप्पा पानसरे व इबारत मुस्तकीम शेख या आरोपींना अटक केली असता त्यांच्याकडून ६० हजार किमतीचे कृषी पंप जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, भगवान शिरसाठ, स.फौ. तुळशीदास सातपुते, पो.हे.कॉ.मारुती काळे, पो.कॉ. सचिन वारे, पो.कॉ.भाऊ काळे, पो.कॉ.गणेश भागडे, पो.कॉ.संपत शिंदे, पो.कॉ.अर्जुन पोकळे आदींच्या पथकाने केली आहे.आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता! ‘कृषी पंपांच्या चोरीचा तपास करण्यात कर्जत पोलिसांना यश आले असले तरी आणखी कृषीपंप जप्त होऊन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे कृषीपंप व केबल चोरीच्या तक्रारी येत आहेत, त्या उघडकीस आणण्यासाठी कर्जत पोलीस प्रयत्नशील आहेत.’-चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत