पुणे.दि२६:- आपण साजरा करीत असलेलाप्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविधप्रयत्नांमुळे लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे.नागरिक व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्यशासनाच्यावतीने लोकोपयोगी योजना राबविण्यात येतात. शासनाबरोबर नागरिकांनीही राज्याच्याविकासामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन अन्न वनागरी पुरवठा मंत्री तथा पालक मंत्री गिरीश बापट यांनी आजशिवाजीनगर येथील पोलीसमुख्यालयाच्या मैदनावर येथे केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजीनगर येथील पोलीसमुख्यालयाच्या मैदनावर ध्वजारोहण समारंभआयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. समारंभास स्वातंत्र्य सैनिक, जिल्हा परिषदअध्यक्ष विश्वासराव देवकाते, आमदार मेधा कुलकर्णी,आमदार निलम गोऱ्हे, आमदार माधुरी मिसाळ,महापौर,मुक्ता टिळक, यशदाचे महासंचालक आनंद लिमये,विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर,जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासीउपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, पोलीस आयुक्तडॉ.के.वेंकटेशम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना .बापट म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला,शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मानयोजनांच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना फायदाझाला आहे. स्वस्त धान्य दूकानांतून धान्यवितरणासाठी ई-पॉस मशिनचा वापर झाल्यामुळेगरीबांना योग्य प्रमाणात आणि वेळेवर धान्य मिळतअसून त्यामुळे केरोसीनची बचत झाली आहे.प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे महिलांना गॅस जोडणीमिळाल्यामुळे महिलांचे जीवन सुखकर झाले असूनमोठया संख्येने नागरिकांनी गॅसवरील सबसीडी सोडूनदिली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे लघु उद्योगांनाकर्ज पुरवठा करण्यात आला आहे. शहराच्यासभेावताली असलेल्या भागाचा पीएमआरडीएतर्फेकरण्यात येत असलेल्या विकास कामांमुळे आणिहिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पामुळे सभोवतालच्या परिसराचा विकास होणार असून हाभाग इकोनॉमीकल कॉरिडॉर म्हणून ओळखला जाईल,असे सांगितले. मतदारांनी सर्व निवडणूकांमध्ये राष्ट्रीयकर्तव्य भावनेतून मतदान प्रक्रियेत भाग घेण्याचेआवाहन त्यांनी यावेळी केले.
पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाजाहीर करण्यात आलेली पदके आणि अन्यपारितोषिके पालकमंत्र्यांच्याहस्ते वितरीत करण्यातआली. पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल,एनसीसी व अग्नीशमन दलाने संचलन करुनपालकमंत्र्यांना मानवंदना दिली. यावेळी विविधशाळांतील मुला-मुलींनी आपल्या गुणदर्शनाचे प्रदर्शनकरुन सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमालाउपस्थित स्वातंत्र्य सैनिक व प्रमुख नागरिकांचीपालकमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी,कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संघटनांचेपदाधिकारी,पत्रकार, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.