पुणे दि,३१ :- कर्नाटकहून सातारा रस्त्यावर येणाऱ्या आयशर टेम्पो मध्ये ३४२ गुटखाची पोती, पुण्यात नेत असताना ४४ लाख रुपये किंमतीचा हिरा गुटखा, सुगंधित पान मसाला, जर्दा लोणंद गुटखा पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना पकडला.या गुटखा वर बंदी असलेला गुटखा माल जप्त करण्यात आला.आहे या कारवाईत गुटखा आणि आयशर टेम्पो असा सुमारे ५२ लाख रुपयांचा ऐवज लोणंद पोलिसांनी पेट्रोलिंग करताना पकडला.आहे
लोणंद पोलिस स्टेशनचे स. पो. नि गिरिश दिघावकर यांना पेट्रोलिंग करताना गुटखा घेऊन टेम्पो कर्नाटकहून सातारा मार्गे पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळाली होती. यावरून पोलिसांनी टेम्पोवर नजर ठेवली. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सपोनि दिघावकर यांनी एएसआय वाघमारे, पो कॉ. व्ही बी शिंदे यांचे समवेत सापळा लावून गोटे माळ येथे टेम्पो MH 16- AE – 9158 ताब्यात घेतला. असताना त्याच्या कडे ३४२ पोती गुटखा बंदी असलेला हिरा गुटखा, सुगंधित पान मसाला, जर्दा असा सुमारे ४४ लाखांचा माल तसेच गाडीची किंमत मिळून असा सुमारे ५२ लाख रुपये किंमतीचा माल पोलिसांनी जप्त केला.आहे व
अन्न व भेसळ विभागाने जप्त केलेल्या मालाची पाहणी करून लोणंद स्टेशनमध्ये जप्त करण्यात आल्या आहेत या प्रकरणी टेम्पो चालक शेख ( रा. श्रीगोंदा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस उप अधीक्षक डॉ. अभिजीत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. आहे व पुढील तपास सपोनि गिरिश दिघावकर करीत आहेत.