पुणे दि,९ :- : पीएमपीच्या ताफ्यात आता 25 ई- बस दाखल झाल्या असून या बसेसचा लाेकार्पण साेहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या या बसेस असून यामुळे प्रदूषणात घट हाेणार आहे. तसेच या सर्व बसेस एसी असल्याने नागरिकांचा प्रवास सुखकर हाेणार आहे.
पुणे कै. बाबुराव सणस मैदानावर “स्वारगेट येथे स्मार्ट इलेक्ट्रिक बस प्रकल्प, स्मार्ट ऑपरेशन सेंटर आणि अन्य स्मार्ट सिटी प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले,
यावेळी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार सर्वश्री जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, महानगरपालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, ( पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड- पीएमपीएमएल)चे संचालक सिध्दार्थ शिरोळे, पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षीत, पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, फ्रान्सच्या (एजन्सी फ्रान्स डेव्हलपमेंट – ए.एफ.डी.)चे प्रादेशिक संचालक निकोलस फोरनेज, फ्रान्सच्या मुंबईतील काऊन्सल जनरल सोनिया बारब्री उपस्थित होत्या.
पीएमपीएमएलकडे सध्या केवळ 2 हजार बस असून त्यांना अजून दीड हजार बसेसची आवश्यकता आहे. यावर्षी महापालिकेने सीएनजी आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या दीड हजार बसेसची खरेदी केली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत पीएमपीएमएलकडे साडेतीन हजार बसेस उपलब्ध होणार आहेत. ही खरेदी प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने झाली असून या माध्यमातून प्रवाशांना साध्या बसच्या दरात एसी बसमधून प्रवास करणे शक्य होणार आहे.
इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हबच्या सिंगल ॲपच्या माध्यमातून बसची सध्याची स्थितीसह त्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या जागेची स्थितीही प्रवाशांना सहज समजणार आहे. तसेच या माध्यमातून बस, मेट्रोमध्ये एकाच तिकीटावर प्रवास करता येणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले.
पुण्याच्या विकासाचा ग्रोथ रोड ठरणाऱ्या १२० किलोमीटर लांबीच्या रिंगरोडचे कामही सुरू करण्यात आले आहे. या विकासाच्या मार्गावरील बदलत्या पुण्यात सर्वसामान्य पुणेकरांसाठी सर्व सोयीसुविधा पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, पुणे शहराची वाहतूक स्मार्ट व पर्यावरणपूरक करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्मार्ट सिटी प्रकल्पाची संकल्पना देशात सुरू झाली. त्यामध्ये पुणे शहराचा सर्वात पहिल्यांदा समावेश करण्यात आला. पुणे शहर आणि परिसर सर्वात वेगाने विस्तारणारे शहर आहे. स्मार्ट सिटीमुळे याला गती मिळेल.
महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, मेट्रो आणि इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून पुण्यातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वारगेट मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हबच्या माध्यमातून पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीला गती मिळेल. शहराला पर्यावरणपूरक बनविण्यासाठी इ-बस सेवेची सुरूवात करण्यात आली आहे. महिलांसाठी ३३ तेजस्विनी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. काही काळातच पीएमपीएमएलच्या माध्यमातून ५०० बसेस पुण्याच्या शहरात धावतील. येत्या दोन वर्षात जुन्या बसेस बंद करून नवीन सीएनजी अथवा इलेक्ट्रिक बसेस पीएमपीएमएलच्या ताफ्यात समावेश करण्यात येणार आहेत. पुणे शहराच्या दळणवळणाला गती देणाऱ्या आणि शहराचे सौंदर्य वाढवाऱ्या या प्रकल्पांचे लोकार्पण होत असल्याचा विशेष आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
सोनिया बारब्री म्हणाल्या, शहरी वाहतूक हा फ्रान्ससाठी महत्वाचा विषय आहे. प्रत्येक शहरांचा विकास होण्यासाठी सार्वजनिक वाहतूक बळकटी करण्याची आवश्यकता आहे. पुणे हे जगातील सर्वात वेगाने वाढणारे आर्थिक आणि औद्योगिक हब असणारे शहर आहे. पुणे शहराच्या विकासाला हा प्रकल्प गती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार माधुरी मिसाळ, ब्रिजेश दीक्षीत यांची भाषणे झाली.
यावेळी पुणे मेट्रो व ए.एफ.डी. फ्रान्स यांच्यात प्रकल्प कर्ज व तांत्रिक सल्ला विषयक करारनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आल्या..
या कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, पुणे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण पूरक सार्वजनिक वाहतूकीसाठी पीएमपीकडून ई- बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत १५० बसेस खरेदी करण्यात येणार असून त्यापैकी २५ बसेस पहिल्या टप्प्यात खरेदी करण्यात आल्या आहेत. संपूर्ण एसी असणाऱ्या या बसेसमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. या बसेसमध्ये पॅनिक बटण असून आपत्कालिन वेळी नागरिकांना त्याचा वापर करता येणार आहे. बसेसला जीपीएस यंत्रणा असून स्वयंचलित दरवाजे आहेत. त्याचबराेबर या बसमध्ये सीसीटिव्ही कॅमेरा सुद्धा लावण्यात आले आहेत. तीन तास बस चार्ज केल्यानंतर ती २०० किलाेमीटर धावू शकणार आहे. सध्या निकडी आणि भेकराईनगर येथे भेकराईनगर येथे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आले आहेत.
खा