पुणे,दि.०२:- कोंढवा परिसरातील दोन हुक्का पार्लरवर मंगळवारी रात्री पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागाचा,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसत्र राबवून २ आरोपींवर कारवाई केली. या कारवाईत ६५ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कोंढवा परिसरात क्लोव्हर हिल प्लाझा इमारती मधील रूफ टॉप कोंढवा येथे लॅविटेट हॉटेल व द ब्रेक रूम हॉटेल या दोन हॉटेल मध्ये अवैद्य हुक्का बार शासनाने बंदी घातलेले तंबाखुजन्य पदार्थ बाळगून हुक्का पार्लर चालवत जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेवरून २ हुक्का पार्लरवर धाडसत्र राबवून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. कोंढवा येथील २ हॉटेलमध्ये इसम टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणाऱया पॉटने हुक्का पिताना पथकाला दिसले. आरोपी याने सदर हॉटेलमध्ये हुक्का पार्लर स्वतः चालवत असल्याचे सांगितल्याने त्यास सदर हुक्का पार्लर चालविण्याच्या परवान्याबाबत विचारपूस केली असता, त्याने कुठल्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगितले. या दोन ही ठिकाणी ६५ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.व कोंढवा परिसरातील हॉटेल क्लोव्हर हिल प्लाझा इमारती मधील रूफ टॉप कोंढवा येथे लॅविटेट हॉटेल व द ब्रेक रूम हॉटेल या दोन हॉटेल येथे एक इसम हुक्का पिताना पथकाला दिसला. सदर ठिकाणी छापा टाकून दोनजणांवर कारवाई करण्यात आली.सदरची उल्लेखनयी कामगिरी अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्रीनिवास घाडगे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, अजय राणे, प्रमोद मोहिते, मनिषा पुकाळे, आण्णा माने, हनमंत कांबळे, अमित जमदाडे व पुष्णेंद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे.