पुणे,दि.०४ :-अनोळखी क्रमांकावरून वीज ग्राहकांना फसवे मॅसेज किंवा फोन व्हॉट्सअप वर येत आहेत. वीज देयक भरणा व केवायसी अपडेट करण्यासाठी सदरील मॅसेज असून ग्राहकांनी याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन वीज वितरण कडून करण्यात येत आहे. बाणेर येथील पल्लोड फार्म – ३, तेजस एलीसियन समोर, बाणेर रोड,, पुणे येथील रहिवासी एका महिला यांची,अशाच प्रकारच्या फसवणूकीला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या खात्यातून तब्बल १ लाख हजार ११ हजार ११९ रुपये हडपल्याचा प्रकार समोर आला आहे अज्ञात मोबाइल नंबरधारकाने व्हॉटस्अॅपवरुन फोन करून, मी महावितरण मधुन बोलत आहे. तुमचे वीज बील भरले नसल्याने, रात्री तुमचे वीज कनेक्शन तोडण्यात येइल, तुमचे वीज कनेक्शन तोडायचे नसल्यास तुम्हाला महावितरणची सिस्टीम अपडेट करायची असुन,टीम व्हुवर अॅप डाउनलोड करा नाहीतर तुमची वीज पुरवठा खंडित केला जाईल वीज कनेक्शन तोडायचे नसल्यास या नंबरवर तुम्ही फोन करा, तुम्हाला महावितरणची सिस्टीम अपडेट करायची असुन,टीम व्हुवर अॅप डाउनलोड करा असे फिर्यादी यांना सांगुन, फिर्यादी यांना कॅल्क्युलेटरवर त्यांचे एटीएमचा पीन नंबर टाकण्यास सांगुन, सदर इसमाने फिर्यादी यांचे बँकेचे खात्या मधुन एकुण १,०१,१९१/ रुपयेची फसवणुक केली आहे. पुढील तपास पो.उप निरी.आर.सी. चाळके करीत आहेत