पुणे,दि.०८ : पुणे शहर आयुक्तालय हद्दीतील बालेवाडी रोड, बाणेर, येथील स्पंदन स्पा,सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय वर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा,पोलिसांनी पर्दाफाश करत ४ पिडित महिलेची सुटका केली, तर स्पा मसाज सेंटर चालविणाऱ्या महिलेला अटक केली. ही कारवाई बुधवार (दि.०७) सायंकाळी करण्यात आली. व स्पा मालक महिलेवर गुन्हा दाखल केली आहे. याबाबत विरूध्द चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे गुरनं ५५२ / २०२२ भादवि ३७०,३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला बाणेर रस्त्यावरील गणराज चौकातील एका इमारतीत स्पंदन स्पा नावाच्या मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा,पोलिसांना मिळाली.पोलिसांनी मिळालेल्या माहितीची खात्री करून स्पा सेंटरवर सायंकाळी सुमारास छापा टाकला.व याबाबत पोलीस कर्मचारी अण्णा माने यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपीन पीडित महिलेला पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते.मिळालेल्या पैशातून आरोपी आपली उपजिविका भागवत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी स्पा सेंटरच्या मालकाला अटक करून आरोपी स्पा मालक व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त, पुणे शहर,संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त गुन्हे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार अजय राणे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.