पिंपरी-चिंचवड,दि.०९:- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या कार्यक्षेत्रातील तीन संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत गुरुवारी कारवाई केली. कुणाल उर्फे बाबा धीरज ठाकूर (वय २२, रा.तळेगाव दाभाडे), करणसिंग राजपुतसिंग दुधाणी (वय २५, रा. हडपसर), सत्यम उर्फे पप्पू दत्तात्रय कड (रा. कडाची वाडी, चाकण) अशी कारवाई केलेल्या टोळीप्रमुखांची नावे आहेत.पप्पू कडवर याच्यावर खून, खुनाच प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला असे ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर, बाबा ठाकूर आणि त्याच्या टोळीतील १३ जणांवर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. क रणसिंग राजपूत यांच्यावर खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दरोड्याची तयारी करणे, घरफोडी, पिस्तुल जवळ बाळगणे असे गंभीर आठ गुन्हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल आहेत.
सन २०२२ मध्ये आजपावेतो १८ गुन्ह्यांत १२९ आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त, अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, श्री. विवेक पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, पद्माकर घनवट, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १ यांचे मार्गदर्शनाखाली, बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगांव दाभाडे पोलीस ठाणे, वैभव शिनगारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस ठाणे, तसेच अंमलदार पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पो.ना. व्यंकट कारभारी पी.सी.बी. गुन्हे शाखा, पो.ना. बर्डे, पो.शि.गुंजाळ, चाकण पोलीस ठाणे, पो.शि. विकास तारू, तळेगांव दाभाडे पोलीस ठाणे, यांचे पथकाने केली आहे.