पिंपरी चिंचवड,दि.०३:-भाजप आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या वर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात लक्ष्मण जगताप यांच्यावर उपचार सुरू होते. अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे आमदार जगताप यांच्या प्रकृतीत नुकतीच लक्षणीय सुधारणा झाली होती. इंजेक्शन दिल्यानंतर ते खुर्चीत बसू व काही पावले चालूही लागले होते. शिवाय विधान परिषद निवडणुकीसाठी जगताप मुंबईला मतदानासाठी देखील गेले होते.
त्यांनी अखेरचा श्वास.
घेतला.आज मंगळवारी सकाळी दुःखद निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील आमदार जगताप महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक होते. त्यांनी सन 2000 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर पदही भूषविले. महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.
लक्ष्मण जगताप यांनी सन 2004 मध्ये पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष निवडून येत विधानपरिषदेत प्रवेश केला. 2009 मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि पहिल्याच निवडणुकीत लक्ष्मण जगताप अपक्ष म्हणून निवडून आले.
लक्ष्मण जगताप यांनी सन 2004 मध्ये पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष निवडून येत विधानपरिषदेत प्रवेश केला. 2009 मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि पहिल्याच निवडणुकीत लक्ष्मण जगताप अपक्ष म्हणून निवडून आले.
2014 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), मनसेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविली. पण, त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी आमदार जगताप यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघावर प्रथमच भाजपचा झेंडा फडकाविला. 2019 मध्येही आमदार जगताप दणदणीत मतांनी विजयी झाले.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अंत्यदर्शन दुपारी 2 ते सायं 6 राहत्या घरी… चंद्ररंग… पिंपळे गुरव….अंत्येष्टी सायं 7 पिंपळे गुरव स्मशानभूमी येथे होणार आहे