पुणे,दि.१०:- पुणे शहर मुंढवा पोलीसांच्या वतीने नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली असून बेकायदेशीर गावठी बनावटीची तलवार व कोयता बाळगणाऱ्या दोन आरोपींना मुंढवा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून तलवार व कोयता जप्त केला.या प्रकरणी १) अक्षय नवनाथ म्हस्के, वय २५ वर्षे, केशवनगर, पुणे २) सुरज संजय सोनोने, वय २० वर्षे, केशवनगर, पुणे ३) रोशन सुरेश पराते, वय २९ वर्षे, केशवनगर मुंढवा पुणे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई मुंढवा परिसरात करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी, दि ०९ रोजी २१.०० वा. ते दि १० रोजी रात्री ०२.०० वा. दरम्यान पुणे शहरात पोलिसांनी ऑल आऊट कोम्बींग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते.व पोलीस आयुक्तयांचे आदेशाप्रामणे मुंढवा पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार इसम इ. तसेच पोलीस ठाणे हद्दीत परहद्दीत दहशद निर्माण करणारे गुन्हेगार तसेच व्हॉटसअप, ऐ इंस्टाग्राम अशा सोशल मिडीयावर कोयते तलवारी सोबत काढलेले व्हिडीओ फोटो अपलो • दहशद निर्माण करणाऱ्या इसमांवर कारवाई करणे अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अजित लकडे यांनी पोलीस ठाणे स्तरावर अधिकारी व अंमलदार यांच्या वेगवेगळया टिम तयार करुन ऑल आऊट / कोम्बींग ऑपरेशन राबविणे असल्याने पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या भागात रवाना केले होते.व सहा. पोलीस निरीक्षक, विलास सुतार, सहा. पोलीस निरीक्षक, संदीप जोरे व पोलीस उपनिरीक्षक, गजानन भोलसे व स्टाफ यांचे टिमने कोम्बींग दरम्यान त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती घेवून गावठी बनावटीची तलवार व कोयता वापरणाऱ्या दोन इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.१) सहा. पोलीस निरीक्षक, विलास सुतार व अंमलदार यांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाल्याने ताडीगुत्ता चौकाकडुन जहांगिर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेट्रोलपंप जवळ, मुंढवा, पुणे येथे इसम नामे अक्षय नवनाथ म्हस्के, वय २५ वर्षे, रा. सर्व्हे नं. ५, सदन निवास, प्रोटेक्ट कॉम्प्युटर कोर्सस जवळ, मयुर कॉलणी केशवनगर, पुणे याचेजवळ लोखंडी मुठीची गावठी बनावटीची तलवार मिळुन आल्याने कायदेशिर कारवाई करुन शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.२) पोलीस उप-निरीक्षक, गजानन भोसले व अंमलदार यांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाल्याने गुरुकृपा सोसायटीच्या बोर्डाजवळ, केशवनगर, मुंढवा पुणे येथे इसम नामे सुरज संजय सोनोने, वय २० वर्षे, रा. यमुना हाईटस्, गुरुकृपा सोसायटी, गणपती मंदीराजवळ, केशवनगर, पुणे याचेजवळ लाकडी मुठीचा कोयता मिळुन आल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.३) सहा. पोलीस निरीक्षक, संदीप जोरे व अंमलदार यांनी खास बातमीदारामार्फत पोलीस उपआयुक्त परिमंडळ-४, पुणे शहर यांचेकडील आदेशाप्रमाणे पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा हद्दीतुन ०२ वर्षाकरीता तडीपार केलेला आरोपी रोशन सुरेश पराते, वय २९ वर्षे, रा. पवार वस्ती, मस्जित जवळ, केशवनगर मुंढवा पुणे यास लोखंडी धारदार कोयत्यासह मिळुन आल्याने तात्काळ ताब्यात घेवून गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे.कामगिरी ही, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, सो, पूर्व विभागाचे अपर पोलीस आयुक्त, रंजन कुमार, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-५ विक्रांत देशमुख, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, बजरंग देसाई, यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अजित लकडे, सहा. पोलीस निरीक्षक, संदीप जोरे, सहा. पोलीस निरीक्षक, विलास सुतार, पोलीस उपनिरीक्षक, गजानन भोसले, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे, दिनेश राणे, हेमंत झुरुंगे, राजू कदम, संतोष जगताप, वैभव मोरे, विजय माने, विजय एस. माने, महेश पाठक, योगेश गायकवाड, राहुल मोरे, दिपक कांबळे, सचिन पाटील यांनी केली आहे.