पुणे,दि.१४:- महाराष्ट्र पोलीस दलाकडे देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून पाहिले जाते. राज्यातील पोलीस दलाकडून कायदा व सुव्यवस्था उत्तम राखली जात असल्याने राज्य प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्य राखीव पोलीस बल क्रमांक 2 मैदान वानवडी येथे आयोजित 33 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2023 च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, मेघना बोर्डीकर साकोरे, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस महासंचालक तथा गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय, पोलीस प्रशिक्षण महासंचालक डॉ. विभागाचे संजय कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंग, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, राज्य राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीवी प्रसाद आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री.फडणवीस म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच लोकशाही मूल्ये जपण्याचे काम पोलीस दल करत आहे. पोलीस कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीत काम करतात. कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून पोलिसांनी उत्तम कामगिरी केली. त्यादरम्यान काही पोलिसांना शहीद व्हावे लागले. अशा परिस्थितीतही पोलिस दलाने सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्याचे काम केले, असे ते म्हणाले.
पोलीस दलासाठी पुणे येथील अत्याधुनिक क्रीडा संकुल
2019 मध्ये पोलिस महासंचालकांनी पुण्यात पोलिस दलातील खेळाडूंसाठी चांगले क्रीडा संकुल बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार पोलीस विभागाकडून अत्याधुनिक क्रीडा संकुल व वसतिगृह बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तो लवकरच मंजूर होईल. बालेवाडीत खेळांसाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. मात्र पोलिसांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी येथे पायाभूत सुविधांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पोलीस दलातील खेळाडू देशाचे नाव मोठे करतात
उपमुख्यमंत्री म्हणाले, पोलीस दलातील खेळाडूंसाठी या स्पर्धा महत्त्वाच्या असून या स्पर्धांमुळे खेळाडूंना वाव मिळतो आणि राष्ट्रीय स्पर्धेतही आपली खेळाडू वृत्तीने दाखवण्याची संधी मिळते. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदके जिंकतात, देशाच्या
गौरवासाठी कार्य करतात. अशा खेळाडूंना वाव देण्यासाठी या स्पर्धा महत्त्वाच्या आहेत.खेळात जय-पराजय असतो, महाराष्ट्र पोलीस दलाकडे देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून पाहिले जाते. राज्यातील पोलीस दलाकडून कायदा व सुव्यवस्था उत्तम राखली जात असल्याने राज्य प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्य राखीव पोलीस बल क्रमांक 2 मैदान वानवडी येथे आयोजित 33 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2023 च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, मेघना बोर्डीकर साकोरे, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस महासंचालक तथा गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय, पोलीस प्रशिक्षण महासंचालक डॉ. विभागाचे संजय कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंग, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, राज्य राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीवी प्रसाद आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच लोकशाही मूल्ये जपण्याचे काम पोलीस दल करत आहे. पोलीस कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीत काम करतात. कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून पोलिसांनी उत्तम कामगिरी केली. त्यादरम्यान काही पोलिसांना शहीद व्हावे लागले. अशा परिस्थितीतही पोलिस दलाने सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्याचे काम केले, असे ते म्हणाले.
पोलीस दलासाठी पुणे येथील अत्याधुनिक क्रीडा संकुल
2019 मध्ये पोलिस महासंचालकांनी पुण्यात पोलिस दलातील खेळाडूंसाठी चांगले क्रीडा संकुल बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार पोलीस विभागाकडून अत्याधुनिक क्रीडा संकुल व वसतिगृह बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तो लवकरच मंजूर होईल. बालेवाडीत खेळांसाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. मात्र पोलिसांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी येथे पायाभूत सुविधांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पोलीस दलातील खेळाडू देशाचे नाव मोठे करतात
उपमुख्यमंत्री म्हणाले, पोलीस दलातील खेळाडूंसाठी या स्पर्धा महत्त्वाच्या असून या स्पर्धांमुळे खेळाडूंना वाव मिळतो आणि राष्ट्रीय स्पर्धेतही आपल्या खेळाडूंना दाखवण्याची संधी मिळते. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदके जिंकतात, देशाच्या गौरवासाठी कार्य करतात. अशा खेळाडूंना वाव देण्यासाठी या स्पर्धा महत्त्वाच्या आहेत.
खेळात जय-पराजय असतो, शेवटी खिलाडूवृत्ती महत्त्वाची असते. खिलाडूवृत्ती आत्मसात केली तर विजय डोक्यात जात नाही आणि पराभवाने निराशाही येत नाही. हरल्यानंतरही माणूस जिद्दीने काम करत राहतो. पोलीस कर्मचाऱ्यांना तणावाचा सामना करावा लागत असल्याने त्यांना त्यातून मुक्त करण्यासाठी खेळ महत्त्वाचे आहेत. फडणवीस म्हणाले की, खेळातून शिस्त आणि जिद्द निर्माण होते.
क्रीडा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल प्रशिक्षण संचालनालयाचे कौतुक करून यातून चांगले खेळाडू तयार होतील जे पोलीस दलाला सन्मान मिळवून देतील, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. स्पर्धेच्या चांगल्या आयोजनाचेही त्यांनी कौतुक केले.
पोलीस महासंचालक सेठ म्हणाले, या स्पर्धा अतिशय स्पर्धात्मक वातावरणात पार पडल्या. पोलिसांच्या खेळाडूंची खिलाडूवृत्ती वाढवण्यासाठी, सांघिक भावना वाढवण्यासाठी, आरोग्य राखण्यासाठी आणि मनोबल वाढवण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त आहेत. या स्पर्धेत 6 नवीन विक्रमांची नोंद झाली. पुण्यात 28 एकर जागेत पोलीस क्रीडा संकुल आणि वसतिगृह बांधण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत 100 मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. फडणवीस यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. महिला गटात मंजिरी रेवाळे हिने सुवर्णपदक, प्रियांका फाळके हिने रौप्य पदक तर निकरिका भोर हिने कांस्य पदक पटकावले. पुरुष गटात पप्पू तोडकर याने सुवर्णपदक, बाबासाहेब मंडलिकने रौप्यपदक आणि मल्लिकार्जुन बिराजदारने कांस्यपदक पटकावले.
राज्य राखीव पोलीस दलाच्या संघाने पुरुष गटात सर्वाधिक पदके पटकावून एकंदर विजेतेपद पटकावले. प्रशिक्षण संचालनालयाच्या महिला संघाने सर्वाधिक क्रीडा विजेतेपदांसह एकूण विजेतेपद पटकावले.
प्रास्ताविक अनुपकुमार सिंग यांनी केले. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आभार मानले.
यावेळी राज्य राखीव पोलीस दल, प्रशिक्षण केंद्र नानविजच्या प्रशिक्षणार्थींनी नाईट सायलेंट आर्म ड्रिल हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. तत्पूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
३३ वा महाराष्ट्र पोलीस राज्य खेळ (आयोजित पुणे शहर), महाराष्ट्र पोलीस अखिल भारतीय खेळ निवडीमध्ये कोल्हापूर परिक्षेत्र (कार्यक्षेत्र) या कबड्डी संघांनी द्वितीय पारितोषिक पटकावले आहे. एसआरपीएफ पोलीस गट 1 आणि 2 येथे या खेळाचे आयोजन करण्यात आले होते.पौड पोलीस स्टेशनच्या अक्षय नलावडे, (राष्ट्रीय खेळाडू) याने योग्य पाचवे कव्हर टाकून संघासाठी चांगला खेळ खेळला. खेळाडू आत्मसात केली तर विजय डोक्यात जात नाही आणि पराभवाने निराशाही येत नाही. हरल्यानंतरही माणूस जिद्दीने काम करत राहतो. पोलीस कर्मचाऱ्यांना तणावाचा सामना करावा लागत असल्याने त्यांना त्यातून मुक्त करण्यासाठी खेळ महत्त्वाचे आहेत. फडणवीस म्हणाले की, खेळातून शिस्त आणि जिद्द निर्माण होते.
क्रीडा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल प्रशिक्षण संचालनालयाचे कौतुक करून यातून चांगले खेळाडू तयार होतील जे पोलीस दलाला सन्मान मिळवून देतील, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. स्पर्धेच्या चांगल्या आयोजनाचेही त्यांनी कौतुक केले.
पोलीस महासंचालक सेठ म्हणाले, या स्पर्धा अतिशय स्पर्धात्मक वातावरणात पार पडल्या. पोलिसांच्या खेळाडूंची खिलाडूवृत्ती वाढवण्यासाठी, सांघिक भावना वाढवण्यासाठी, आरोग्य राखण्यासाठी आणि मनोबल वाढवण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त आहेत. या स्पर्धेत 6 नवीन विक्रमांची नोंद झाली. पुण्यात 28 एकर जागेत पोलीस क्रीडा संकुल आणि वसतिगृह बांधण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत 100 मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. श्री. फडणवीस यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. महिला गटात मंजिरी रेवाळे हिने सुवर्णपदक, प्रियांका फाळके हिने रौप्य पदक तर निकरिका भोर हिने कांस्य पदक पटकावले. पुरुष गटात पप्पू तोडकर याने सुवर्णपदक, बाबासाहेब मंडलिकने रौप्यपदक आणि मल्लिकार्जुन बिराजदारने कांस्यपदक पटकावले.
राज्य राखीव पोलीस दलाच्या संघाने पुरुष गटात सर्वाधिक पदके पटकावून एकंदर विजेतेपद पटकावले. प्रशिक्षण संचालनालयाच्या महिला संघाने सर्वाधिक क्रीडा विजेतेपदांसह एकूण विजेतेपद पटकावले.
प्रास्ताविक अनुपकुमार सिंग यांनी केले. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आभार मानले.
यावेळी राज्य राखीव पोलीस दल, प्रशिक्षण केंद्र नानविजच्या प्रशिक्षणार्थींनी नाईट सायलेंट आर्म ड्रिल हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. तत्पूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
३३वा महाराष्ट्र पोलीस राज्य खेळ (आयोजित पुणे शहर), महाराष्ट्र पोलीस अखिल भारतीय खेळ निवडीमध्ये कोल्हापूर परिक्षेत्र (कार्यक्षेत्र) या कबड्डी संघांनी द्वितीय पारितोषिक पटकावले आहे. एसआरपीएफ पोलीस गट 1 आणि 2 येथे या खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
पौड पोलीस स्टेशनच्या अक्षय नलावडे, (राष्ट्रीय खेळाडू) याने योग्य पाचवे कव्हर टाकून संघासाठी चांगला खेळ खेळला