पिंपरी चिंचवड,दि.०१:- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तील पोलीस दलातील ७ पोलीस अधिकारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांना आयुक्तालयाच्या वतीने निरोप देत भावी जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झालेबाबत..
मंगळवारी (दि. ३१) रोजी रोजी पोलीस आयुक्त कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवर नेमणुकीस असलेले १. संजय शकंर सरकाळे, पोलीस उप निरीक्षक, नेम वाकड पोलीस स्टेशन, २ . राजेंद्र हरिदास चौधरी, पोलीस उप निरीक्षक नेम, नियत्रंण कक्ष, पिंपरी चिंचवड, ३ . राजेंद्र केशव भोसले, सहायक पोलीस उप निरीक्षक नेम, पिंपरी वाहतुक शाखा, पिंपरी चिंचवड, ४ . शिरीष कोंडाजी रसाळ, पोलीस उप निरीक्षक नेम, पिंपरी पोलीस स्टेशन, ५. संजय लिलाधर कुलकर्णी, पोलीस उप निरीक्षक नेम, वाकड पोलीस स्टेशन, ६. बबन सटबाजी डोईफोडे, सहायक पोलीस उप निरीक्षक नेम, आळंदी पोलीस स्टेशन, ७ देवदत्त माधवराव पवार, कार्यालय अधीक्षक, पिंपरी चिंचवड हे नियत वयोमानानुसार पोलीस दलातून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी बोलताना विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे आपण जरी सेवानिवृत्त झालेला असाल तरी सुध्दा पोलीस विभागासाठी आणि समाजासाठी कार्य करावे व आपल्या अनुभवाचे योगदान द्यावे असे सांगितले.
सदर कार्यक्रम प्रसंगी. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, रावसाहेब जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी यांचेसह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी अंमलदार यांनी देखील सत्कारमुर्ती यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.