पुणे दि.०६:-महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय वार्षिक क्रीडास्पर्धा ६ ते ९ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान येरवडा येथील दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या असून स्पर्धांचे उद्घाटन अपर पोलीस महांचालक व महानिरीक्षक,कारागृह व सुधरसेवा महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, योगेश देसाई, प्राचार्य चंद्रमणी इंदुरकर,येरवडा कारागृह अधीक्षक शिवशंकर पाटील व राज्यातील विविध कारागृहांचे अधीक्षक व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्पर्धेत १०० मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी, ८०० मीटर धावणे, रिंग टेनिस, व्हॉलिबॉल, कबड्डी, कराटे,भालाफेक,४×१०० रिले, ४०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, मॅटवरील कुस्ती ,चालणे इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.