पुणे,दि.१०:- मोहळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत विठ्ठल माने यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न आरोपी कुडून फसला. माने यांनी पुणे शहर सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी राजस्थान येथील भरतपूर येथून आरोपीला अटक केली.
आरोपींनी माने यांचा सोशल मीडियावरुन नंबर मिळवला त्यानंतर त्यांना व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवून तसेच अश्लील व्हिडिओ पाठवून कॉल करुन भूरळ पाडण्याचा प्रयत्न केला. आरोपीने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ कॉल माने यांना पाठवून त्यांच्या फेसबुकवर असलेले मित्र यांना पाठवण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडे एक लाख रुपये खंडणी मागितली. खंडणीची रक्कम तात्काळ दिली नाही तर रेकॉर्ड केलेला अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी आमदार यशवंत माने यांना
आमदार यशवंत माने हे पुण्यात राहण्यास आहेत. त्यांना 23 जानेवारी रोजी फेसबुकद्वारे मॅसेज आले होते. अनोळखी तरूणीचे मॅसेज आल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. पण, त्यांना सतत 7 दिवस मॅसेज करण्यात आले. तर, 31 जानेवारी रोजी थेट फेसबुकवरच व्हिडीओ कॉल आला. त्यांनी याकडेही दुर्लक्ष केले. मात्र, काही तरी गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सतत फोन येत असल्याने त्यांनी शेवटी रात्री दहाच्या सुमारास तो व्हिडीओ कॉल उचलला. त्यावेळी काही सेंकदासाठी तो कॉल सुरू राहिला. त्यानंतर तो कट झाला. पण, त्यानंतर त्यांना धमकीचे फोन सुरू झाले. आम्ही तुमचे व्हिडीओ व्हायरल करू असे म्हणत त्यांना स्क्रीन शॉट पाठविले. त्यांच्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली. याबाबत माने यांनी पुणे शहर सायबर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी भरतपूर, राजस्थान येथील असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक भरतपूर येथे पाठवून आरोपींचा शोध सुरु केला.
सायबर पोलिसांच्या पथकाने भरतपूर येथे आरोपीचा शोध घेऊन रिझवान अस्लाम खान (वय-24 रा. ग्राम सिहावली महारायपूर, ता. नगर, जि. भरतपूर, राजस्थान) याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याचे दिसून आले. आरोपीकडून चार मोबाईल, चार सीमकार्ड जप्त केले आहेत. जप्त केलेल्या मोबाईलमध्ये स्क्रिन रेकॉर्ड केलेले जवळपास 90 अश्लिल व्हिडिओ आढळून आले आहे. आरोपीला न्यायालयात सादर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बलभिम ननवरे करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील, सहायक पोलीस निरीक्षक बलभिम ननवरे,
पोलीस उपनिरिक्षक सचिन जाधव, राजकुमार जाबा,
शिरीष गावडे, श्रीकृष्ण नागटिळक, संदिप यादव, प्रविणसिंह राजपुत, पूजा मांदळे यांच्या पथकाने केली.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
पुणे सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, 7742670385, 8865024862, 8001970178, 9587342828 या क्रमांकावरुन संपर्क करुन अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी (Threat) देऊन पैसे मागितले असल्यास किंवा मागत असल्यास तात्काळ सायबर पोलीस स्टेशन कडे संपर्क साधावा. अथवा 7058719375, 7058719371 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.