पुणे,दि.२८:- पुणे शहरातील शिंदेवणे काळेश्वर गाव, राठोड वस्ती, उरुळी कांचन, परिसरात असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागा, गुन्हे शाखा पाेलिसांनी छापा मारला असून, ३ लाख ४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत ३ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, पुणे शहरात हातभट्टी दारुनिर्मिती आणि विक्री करणाऱ्याविराेधात कारवाई करण्याचे आदेश व अवैध धंदे वर पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागा, गुन्हे शाखा पोलिस पथकाने ऊरूळी परिसरात असलेल्या हातभट्टीच्या अड्ड्यावर सोमवार दि.२८ रोजी छापा मारला. दरम्यान, पथकाने हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे २ हजार ७०० लिटर रसायन, हातभट्टी निर्मिती करण्याचे साहित्य आणि हातभट्टी दारु असा एकूण ३ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पाेलिस पथकाने रसायन, हातभट्टी आणि हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे साहित्य नष्ट केले. असुन, सदरबाबत एकुण तीन आरोपी विरूध्द लोणी काळभोर गुरनं. १७२ / २०२३ महाराष्ट्र प्रोव्हि.कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, त्यांना पुढील कारवाई करीता लोणी-काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर,संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर,रामनाथ पोकळे,पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर,अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे व अमित जमदाडे या पथकाने केली आहे.