पुणे,दि.११:- लग्नानंतर जोडीदारासोबत शारीरिक संबंध न ठेवणे क्रुरताच असल्याचा निष्कर्ष काढत कौटुंबिक न्यायालयाने पतीने केलेला घटस्फोटासाठीचा अर्ज मंजूर केला.
प्रमुख न्यायाधीश हितेश गणात्रा यांनी हा निकाल दिला.
दोघांचा एप्रिल 2020 मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर ती नांदण्यास सासरी गेली. मात्र, तिने पतीसोबत शरीर संबध ठेवण्यास नकार दिला. ती वारंवार माहेरी जात असत. पतीला तिच्या चारित्र्याबद्दल संशय येत होता. दरम्यान काही कालावधी गेल्यानंतर पत्नी घर सोडून निघून गेली होती. पतीने पोलिसात पत्नी हरविल्याची तक्रार दिली.
दरम्यान पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. त्यावेळी मी मर्जीने घर सोडून गेले होते. मला पतीबरोबर संसार करायचा नाही’ असा जबाब दिला. तर त्या नात्यातील व्यक्तीने दोघे सोबत गेल्याचा जबाब दिला. त्यामुळे पतीने मानसिक क्रूरतेच्या कारणाखाली घटस्फोट मिळण्यासाठी डिसेंबर 2021 मध्ये अॅड. के. टी. आरू-पाटील यांच्या वतीने कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता.पत्नी चे पती सोबत का राहत नाही हे न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्याचे कारणही घटस्फोटासाठी महत्त्वपूर्ण ठरले.