पुणे,दि.२८ :- पुणे शहरातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात हद्दीती गंभीर गुन्हे दाखल असलेला एका अट्टल गुन्हेगारावर प्रथम उर्फ आकाश तुळशीदास विटकर याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. आरोपीने वडारवाडी गोखलेनगर व इतर परिसरात दहशत माजवली होती. पोलीस आयुक्त रितेश कुमार
यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत केलेली ही 8 वी कारवाई असुन.
आरोपी प्रथम उर्फ आकाश तुळशीदास विटकर (वय- २२ रा. वडारवाडी, पुणे) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदरांसह वडारवाडी गोखलेनगर व इतर परिसरात तलवार, कोयता, बॅट या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, जबरी दुखापत, वाहनांची तोडफोड, दंगा, दगडफेक, विनापरवाना शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्यावर मागील पाच वर्षात ९ गुन्हे दाखल आहेत.आरोपी आकाश विटकर याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण यांनी वरिष्ठांच्या मार्फत पोलीस आयुक्तांना दिला होता. प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपीला एमपीडीए कायद्यान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृहात एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत ही कामगिरी पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे यांनी केली.