पुणे ग्रामीण,दि.३०:- पुण्याला निघालेला अकलूज-इंदापूर रस्त्यावरुन १८ लाख ८ हजार ८०० रुपयांचा गुटखा मंगळवारी (दि.२९) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास इंदापूर पोलिसांनी पकडला. व दोघांना अटक करण्यात आली.प्रकाश कुशान हेगरे (वय २६ वर्षे, रा. बेळगाव, मल्लू जयश्री मेलगडे (वय- १८ वर्षे, रा. विजापूर) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात गुटख्यासह गुन्ह्यात वापरण्यात आलेली पिकअप असा ऐकुन २४ लाख ८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार सुनील बालगुडे व पोलीस शिपाई विकास राखुंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकलूज ते इंदापूर राज्यमार्गावरुन पुण्यात गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व इतरांच्या पथकाला कारवाई करण्याचा आदेश दिला.त्यानूसार या पथकाने बावडा ते इंदापूर राज्यमार्गावर सापळा रचला. दरम्यान एक संशयित पिकअप (क्र.एम.एच.१३ डी.क्यू. २४९६) येताना दिसली. तिला थांबवून तिच्यामध्ये तपासणी केली असता गुटखा आढळून आला. गाडी चालक व त्याच्या साथीदाराला अटक करुन मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग, गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप पवार पोलीस निरीक्षक इंदापूर पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार बालगुडे, पोलीस शिपाई विकास राखुंडे यांनी केली.व पुढील तपासस हाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.