पुणे ग्रामीण,दि.०३:- पुण्याला घेऊन निघालेला खेड शिवापूर परिसरात ५५ लाख ६२ हजार ७१२ रुपयांचा गुटखा रविवारी (दि.०२) रोजी पाहाटे घ्या सुमारास खेड शिवापूर येथे स्थायिक गुन्हे शाखा पोलिसांनी पकडला. व एकास अटक करण्यात रमेश मोतीराम चौधरी, वय ३७ वर्षे, रा श्रीरामनगर ता हवेली जि पुणे अशा एका आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात गुटख्यासह गुन्ह्यात वापरण्यात आलेली ब्रिजा कार व इतर मुद्देमाल असा ऐकुन ६५ लाख १८ हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पुणे ग्रामीण स्थायिक गुन्हे शाखा पोलिसांना माहिती मिळाली की राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड शिवापूर मार्गावरुन पुण्यात गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने मार्गावर सापळा रचला. दरम्यान एक संशयित एक पांढरे रंगाची ब्रिझा कार नं एम. एच. १२ टी. एस. १६१४ या मध्ये विमल कंपनीचा गुटख्याचे एक पोते इसम नामे रमेश मोतीराम चौधरी, याचेकडून जप्त केले आहे तसेच त्याने सदर गुटख्याचा माल त्याचे शिंदेवाडी येथील गोडाऊन मधून आणला असल्याचे सांगून कोंढणपूर रोडवर श्रीरामनगर येथे एक गोडाऊन असल्याचे त्याने सांगितले. दोन्ही गोडाऊनची पोलिसांनी तपासणी केली असता विमल, आर. एम. डी. रजनीगंधा, राजनिवास, राजश्री, व्ही-१ नावाचा एकुण रू. ५,५६२,७१२/- किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व तंबाखु असा माल, रू. ३,४५,०००/- रोख रक्कम, दोन मोबाईल फोन व एक ब्रिझा कार असा एकुण रू. ६५,१८,७१२/- रू. किं.चा मिळून आला असून इसम नामे रमेश मोतीराम चौधरी यास ताब्यात घेवून राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवून ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपीस मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता त्याची दिनांक ०५/०४/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेली आहे.
सदरची कामगिरी अंकित गोयल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मितेश गट्टे अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे, भाऊसाहेब ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि महादेव शेलार, पोसई प्रदीप चौधरी, पोहवा. सचिन घाडगे, पोहवा. अजित भुजबळ, पोहवा गुरू जाधव, पोहवा गोरख पवार, राजगड पोस्टे कडील सपोनि मनोजकुमार नवसरे, पोहवा संतोष तोडकर, यांनी केली.