पुणे,दि.०६:–पुणे शहरातील सावित्रीबाई पुणे विद्यापीठ चौकातील स्वामी विवेकानंद, व मॉडन कॉलेज व शाळां व सावित्रीबाई पुणे विद्यापीठ कॉलेजच्या गेटच्या समोर शंभर मीटरच्या आतच तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री सुरू आहे. शाळा व कॉलेज जवळ पानटपऱ्यांवर सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे; परंतु अशा विक्रेत्यांवर कोणतीच कारवाई होत नाही.कॉलेज व शाळांकडून त्यांच्या विरोधात तक्रारी करूनही कोणतीच कारवाई होत नाही.
कॉलेज व शाळांभोवती झूंजार च्या प्रतिनिधीने फेरफटका मारला असता असे निदर्शनास आले की, अनेक शाळांना लागून असलेल्या पानटपऱ्या, दुकानांमध्ये सिगारेट, विडी आणि गुटखा सह तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे. पुणे विद्यापीठ चौकातील स्वामी विवेकानंद, व मॉडन कॉलेज व शाळांच्या व सावित्रीबाई पुणे विद्यापीठ कॉलेजच्या शाळेच्या लागूनच दोन पानटपरी आहे. कॉलेज शाळा आहेत या टप-यांवर अन्न व औषध प्रशासन कोणतीच कारवाई करीत नाही. सर्वच शाळांचे संचालक या विषयी तक्रार करून थकले; परंतु कारवाई होत नाही, असे शाळा संचालकांचे म्हणणे आहे.
पुणे महापालिकेला अर्ज दिले. पानटपऱ्यांचे फोटो दिले. आता आम्ही थकलो. कोणतीही कारवाई झाली नाही कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी पान टपरी शेजारी सर्रासपणे रोडला थांबून सिगरेट पिताना पाहण्यास मिळत आहे पुणे महापालिका, अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करायला हवी. परंतु सर्रासपणे गुटका सिगरेट तिथे थांबून व्यसन करताना मुली व मुल पाहण्यास मिळत आहे व अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने कधी कारवाई हे नागरिकांन कडून चिंता व्यक्त केली जात आहे