चंडीगड, हॉकी हरियाणा संघानेसुद्धा या स्पर्धेत आगेकूच केली. दिल्ली हॉकी आणि तामिळनाडू हॉकी संघांना शुक्रवारी मात्र निराशाच पदरी आली.
गतवेळेस अजिंक्यपद पटकावणाऱ्या हॉकी पंजाब संघाची खेळी यंदा काहीशी लडखडली. नॉकआऊटमध्ये जाण्यासाठी एका विजयाची गरज असताना हॉकी पंजाबने शुक्रवारी (22 फेब्रुवारी) हॉकी हिमाचलला 6-0 ने दणदणीत मात देत आपली गुणसंख्या सात पर्यंत नेत बाद फेरीकडे कूच केली.
हॉकी चंडीगड संघाने तामिळनाडू हॉकी संघाला 4-1 ने मात देत 10 गुणांच्या साथीने नॉकआऊट मध्ये स्थान मिळवले. हॉकी चंडीगडच्या विजयाने हॉकी पंजाबचा नॉकआऊटचा प्रवास सोपा झाला. या सामन्यातील सगळे पाच गोल मध्यांतरापुर्वीच झाले. हॉकी चंडीगडच्या हाशिम (3 मि., 7 मि.) ने दोन गोल केले. त्याचा साथीदार मनिंदर सिंग (14 मि., 16 मि.) ने अजुन दोन गोल करत चंडीगडची आघाडी 4-0 अशी वाढवली. तामिळनाडूच्या एस. कार्थीने 20 व्या मिनीटांत पेनल्टी स्ट्रोकने ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर मध्यप्रदेश हॉकी अकादमीने मणिपुरला 5-0 च्या फरकाने मोठा पराभव चिकटवला. आता या गटातील मणिपुर आणि हॉकी झारखंडच्या गुणसंख्येसह बरोबरी साधली. तथापी गोल संख्येच्या आधारावर मध्यप्रदेश हॉकी अकादमी आपल्या गटात दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्यातर्फे हैदर अली (3 मि.), अख्तर अली (9 मि.), यांनी सुरुवातीला चांगला खेळ करुन आघाडी मिळवली. त्यानंतर मोहमद अलिशान (52 मि.), आणि अक्षय अवस्थी (54 आणि 57 मि.) यांनी कळस चढवला.
क गटात गंगपूर-ओडिशा, उत्तरप्रदेश हॉकी पात्र
क गटात हॉकी गंगपूर-ओडिशा आणि हॉकी उत्तरप्रदेश संघांना नॉकआऊटमध्ये जाण्यासाठी एका विजयाची मोठी गरज होती. या संघांनी आपला अस्तित्व टिकवत शुक्रवारी आपल्या प्रतिस्पर्धींना नमवले. हॉकी गंगपूर ओडिशाने हॉकी कर्नाटक संघाला 1-0 ने मागे टाकले. गंगपूर ओडिशाच्या पुरण केरकेट्टाने 59 व्या मिनीटांत गोल करुन सामन्याचा निकाल लावला. त्यावर उत्तर प्रदेश हॉकीने आपला शेजारी हॉकी दिल्लीला 3-0 च्या फरकाने हरवत नॉकाआऊट मध्ये स्थाम मिळवले. उत्तरप्रदेशतर्फे शहाबाज खान (28 मि.) उत्तम सिंग (44 मि.), अजय यादव (59 मि.) यांनी धूरा सांभाळली. या विजयांसह हॉकी गंगपूर-ओडिशा आणि उत्तरप्रदेश हॉकी नॉकआऊट फेरीत पोहोचले आहेत.
ड गटात शुक्रवारच्या झालेल्या शेवटच्या सामन्यात हॉकी बिहार संघाने पंजाब ऍण्ड सिंध बॅंकच्या चमूला 1-0 ने मात दिली. पिंकल बार्लाने 38 व्या मिनीटांत गोल करत बिहारसाठी निर्णायक कामगिरी केली. सहा गुणांसह गटात बिहार (6 गुण) पुढे सरकला तर पंजाब ऍण्ड सिंध बॅंक संघ (0 गुण) हा तळाशी कायम आहे.
गुरुवारचे निकाल
गट अ ः हॉकी पंजाब ः 6 (सुदर्शन सिंग 8 मि., 41 मि. तिक शर्मा 15 मि., विशालजित सिंग 44 मि., जसप्रित सिंग 25 मि., गुरपाल सिंग 26 मि.) वि. वि हॉकी हिमाचल ः 0. हाफ टाईम ः 4-0
गट अ ः हॉकी चंडीगड ः 4 (हाशिम 3 मि., 7 मि. मनिंदर सिंग 14 मि., 17 मि.) वि. वि तामिळनाडूचा हॉकी संघ ः 1 (एस. कार्थी 20 मि.) हाफटाईम ः4-1
गट ब ः हॉकी हरियाणा ः 3 (अंकुश 19 मि, सनी मलीक 31, 56 मि.) वि. वि. द मुंबई हॉकी असोसिएशन ः 0 हाफटाईम 3-0
गट ब ः मध्यप्रदेश हॉकी अकादमी: 5 (हैदर अली 3 मि., अख्तर अली 9 मि., मोहमद अलिशान 52 मि., अक्षय अवस्थी (54, 57 मि.) वि. वि. मणिपुर ः 0 हाफ टाईम ः 2-0
गट क ः हॉकी गंगपूर ओडिशा ः 1 (पुरण केरकेट्टा 59 मि.), वि. वि. हॉकी कर्नाटक ः 0. हाफ टाईम 0-0
गट क ः उतरप्रदेश हॉकी ः 3 (शहाबाज खान 28 मि., उत्तम सिंग 44 मि., अजय यादव 59 मि.) वि. वि. दिल्ली हॉकी ः 0. हाफ टाईम 1-0
गट ड ः हॉकी बिहार ः 1 (पिंकल बार्ला 38 मि.)वि. वि. पंजाब ऍण्ड सिंध बॅंक 0. हाफ टाईम 0-0
शनिवारचे सामने
गट ड ः हॉकी ओडिशा वि. हॉकी बिहार (दुपारी एक)
गट ड ः भारतीय खेळ प्राधिकरण वि. स्टील प्लांट स्पोर्ट बोर्ड (दुपारी अडिच)
—