पुणे,दि.०८ :- पुणे शहर पोलीस ॲक्शन मूडमध्ये पाहण्यास पुणे शहरात दिसत आहे तर काही दिवसापासून गुन्हेगारांनी व अवैद्य धंदा करणाऱ्यांने पुणे शहर पोलिसांचा धसका घेतला आहे मटका, गुटखा, स्पा, सह इतर अवैद्य धंदा करणाऱ्यांवर पुणे शहर पोलिसांनी. पोलीस स्टेशन पासून ते सामाजिक सुरक्षा विभागा सह छापे मारी सूरु केली आहे हडपसर भागातील एका लाॅजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला. पथकाने गुरुवार दि.०६ रोजी एका लाॅजवर छापा टाकत लॉजचे चालक, पाहीजे आरोपी एक मॅनेजर पाहीजे आरोपी व आणखी एक मॅनेजर असे तीन इसमा आराेपीस ताब्यात घेतले. दोन पीडित महीलांची सुटका केली.हडपसर भागातील एका लाॅजवर महीलांन कडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागास मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पाेलिस यांनी हॉटेल रॉयल लॉजिंग, देवीका प्लाझा बिल्डींग, फुरसुंगी रोड हरफळे पार्क पुणे येथील एका लाॅजवर छापा टाकला. तेथून तिन आराेपीस ताब्यात घेत दोन पीडित महीलांची सुटका करण्यात आली. आराेपींविराेधात विरूध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गुरनं ५४३ / २०२३ भादवि ३७० ३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी चालक मॅनेजर व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, रेश्मा कंक, अमित जमदाडे, किशोर भुजबळ, ओंकार कुमार या पथकाने यशस्वी केली आहे.