पुणे,दि.०९:- लोणी काळभोर परिसरातील पेट्रोल कंपन्यांमधून पेट्रोल घेऊन ते काळ्या बाजारात विकण्यासाठी साठा करुन ठेवलेले चार टँकर पुणे शहर पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून २ कोटी २८ लाख ५ हजार ९९५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. लोणी काळभोर येथील एच पी ट्रमिनलमधून पेट्रोल, डिझेल घेऊन टँकर बाहेर पडतात. त्यानंतर वाटेत थांबून त्यातील काही लिटर पेट्रोल, डिझेल चोरून त्याचा काळा बाजारात विक्री करतात हडपसर परिसरातील लक्ष्मी कॉलनी येथे चार टँकर थांबले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. व छापा दि.८ रोजी सकाळी ०६/३० वा चे सुमारास छापा टाकला असता, सदर ठिकाणी दोन एचपीसीएल कंपनीचे टैंकर मधील बॉल बॉक्स मधुन इंधन काढताना व सदर ठिकाणी इंधनाने भरलेले १४ प्लॅस्टीकचे कॅन मिळुन आले. पुढील कारवाई करणेकामी सबंधित एचपीसीएल कंपनीचे अधिकारी व परीमंडळचे विभागाचे अधिकारी यांना पत्रव्यवहार करून समक्ष बोलावून घेतले.व
सदर ठिकाणी सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे यांनी तात्काळ भेट दिली, सदर घटनेबाबत हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास वरीष्ठांचे आदेशान्वये सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.सदरची कामगिरी ही रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर संदिप कर्णिक, सह पोलीस आयुक्त पुणे शहर रंजनकुमार शर्मा सगो, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग व विक्रांत देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे,अरविंद गोकुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक: हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, दिगंबर शिंदे पोनि (गुन्हे) विश्वास डगळे पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशिल लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, मनोज सुरवसे, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, रशिद शेख, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, प्रशांत टोणपे, अतुल पंचरकर, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, कुंडलीक केसकर यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.