पुणे ग्रामीण,दि.२३: लोणावळा ग्रामीण पोलीसा यांनी टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट याठिकाणी वेळेचे निर्बंध न पाळता रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्या 8 टपरी चालकांच्या विरुद्ध संयुक्तपणे कारवाई केली.
लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तीक यांच्या नेतृत्वाखाली बेकायदेशीर सुरू असलेले व्यवसायिकांवर कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. तसेच टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट या ठिकाणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील आतवण (ता. मावळ) गावचे हद्दीमध्ये असणाऱ्या टायगर पॉईंट या पर्यटन स्थळावर रविवारी २३ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास वेळेचे निर्बंध न पाळता ८ टपरी व्यवसायीक आपला व्यवसाय करताना पोलिसांना आढळून आले. या सर्वांच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ (डब्ल्यू) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही सत्यसाई कार्तीक, त्यांच्या पथकातील पो. कॉ. सुभाष शिंदे, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक निलेश माने, पो. कॉ. केतन तळपे, मच्छिंद्र पानसरे, पो.ना. प्रणयकुमार उकिर्डे यांनी केली आहे.
सदर ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीकांनी वेळेचे निर्बंध पाळून आपला व्यवसासय करावा. पर्यटनाकरीता आलेल्या पर्यटकांनी रात्री 7 ते सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान टायगर पॉईंट येथे फिरण्याकरीता जावू नये असे आवाहन लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री. सत्यसाई कार्तीक यांनी केले आहे.