पुणे,दि.२५ :-पुणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभागाचे आज घोले रोड क्षेत्रीय कार्यालय परिसरात अतिक्रमण विभागाचा परवाना असून सुद्धा काही टपरीवर कारवाई झालेली आहे काही दुकानदारांचा त्या टपरीमुळे त्यांच्या व्यवसायावर फरक पडत असल्याने त्याची परवाना असून सुद्धा त्याच्यावर तक्रारी अर्ज केला होता व त्याच्याकडून चिरीमिरी घेऊन तक्रार अर्ज आल्याचे कारण सांगून कारवाई करताना काही ठिकाणी आज दिसले आहे व पाहायला मिळत आहे हा निव्वळ कागदावर असून पुणे शहरातील घोले रोड क्षेत्रीय कार्यालये यांना राजरोसपणे केले जाणारे अतिक्रमण करून फुटपाथवर व्यवसायावर रोखण्यास या विभागास पार अपयश आले आहे.पुणे शहरातील दररोज तात्पुरत्या स्वरुपाचे व काही ठिकाणी कायमस्वरुपी व्यवसाय करणारे अतिक्रमण करून मागचा पुढचा विचार न करता सर्रास करतात. व्यावसायिक राजरोसपणे सिलेंडरचा वापर स्नॅक्स सेंटर वाले करताना दिसून येत आहे तर ज्यूस सेंटर वाले टपऱ्या टाकून व्यवसाय करताना खुलेआम दिसत आहे अतिक्रमण हे मोठ्या घोले रोड क्षत्रिय कार्यालय परिसरातील हद्दीत दिसून येत आहे. या अतिक्रमणामुळे वाहतूकीला व पादचाऱ्यांना कमालीचा त्रास होतो. अतिक्रमण करणारे मोजके व त्याचा त्रास सहन करणारे हजारो असे गणित पुणे शहरातील काही ठिकाणी दिसते. अनेकदा वरिष्ठ अधिकारी फौजफाटा घेऊन अतिक्रमण हटवताना दिसतात खरे पण त्यांची पाठ फिरताच परत परिस्थिती जैसे थे होते. सामान्य लोक भीतीपोटी ही अतिक्रमणे मुकाट सहन करतात, ज्यांनी कारवाई करावी अशी अपेक्षा असते असा अतिक्रमण विभागही अनेकदा भीतीपोटी कारवाईच्या भानगडीतच पडत नाही, हे पुण्यातील चित्र आहे. वास्तविक अतिक्रमण विभागाने किमान वर्दळीच्या रस्त्यांवर होणारे अतिक्रमण रोजच्या रोज काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जो पर्यंत फार आरडाओरड होत नाही तो वर हा विभाग फार काही करतच नाही असा सर्वसाधारण अनुभव आहे. नागरिकांकडून फारच आरडाओरड झाली तर तात्पुरत्या स्वरुपाची कारवाई होत, अर्थात अतिक्रमण करणारे या कारवाईला फारशी भीक घालत नाहीत आणि प्रशासनाचा वचकच नाही ही बाब पुणे शहरात सर्वांनाच कळून चुकली आहे. वाहतूकीने व रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यायला हवा अशी हजारो पुणे करांची इच्छा आहे, मात्र प्रशासनाची कार्यालयाबाहेर पडून काही करण्याची तयारीच नाही, काही ठराविक लोकांसाठी हजारो लोकांना होणारा त्रास नगरपालिका प्रशासनाला काहीच वाटेनासा झाला असल्याने कडक कारवाई होत नाही. लुटूपुटीची कारवाई…वृत्तपत्रात बातम्या आल्यानंतर नगरपालिका लुटूपुटूची कारवाई त्या दिवसापुरती करते, मात्र त्यात अजिबात सातत्य नसते व या कारवाईला कोणी जुमानत नाही असेच पुण्यातीत चित्र आहे.